Kolhapur Politics: 'बटेंगे तो कटेंगे'; कोरे-मुश्रीफ-पाटलांची सहकारातील दोस्ती तुटणार की टिकणार?

Kolhapur Politics Gokul Dudh Sangh : जिल्ह्यातील सहकार क्षेत्र महाडिक पाटील कोरे आणि मुश्रीफ यांच्या भोवतीच फिरत आहे. मागील गोकुळ दूध संघात महाडिक यांना बाजूला करण्यासाठी हे तिघेही एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.
Kolhapur Politics
Kolhapur PoliticsSarkarnama
Published on
Updated on

बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, असा नारा देत कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीच्या दहाही जागा निवडून आल्या आहेत. काँग्रेस नेते सतेज पाटील यांना हा धक्का मानला जातो. मात्र सहकारात असलेली अंडरस्टँडिंग पॉलिटिक्स जिल्ह्यात सध्या जोर धरू लागली आहे.

जिल्ह्यात दहावी जागा महायुतीच्या आल्याने सहकारी संस्थेत उलटफार करण्यासाठी अनेक महायुतीच्या नेत्यांना वेध लागलेत. पण सहकारात असलेली पाटील-मुश्रीफ- कोरे यांची दोस्ती तुटणार की टिकणार हे लवकरच समजेल. जिल्ह्यातील राजकारण जसं फिरलं तसं सहकारातील दिशा देखील फिरणार असल्याचे बोल आता महायुतीच्या नेत्यांकडून येत आहेत.

2026 ला गोकुळ दूध संघाची निवडणूक होणार असली तरी आतापासूनच त्याच्या तयारीला महायुतीचे नेते लागले आहेत. पण सहकारात मित्र असलेले मुश्रीफ आणि पाटील हे दोघेही एकमेकांचे महत्त्व जाणून आहेत. शिवाय कोरे यांना देखील बाजूला करणे पाटील यांना न परवडणारे आहे.

Kolhapur Politics
Eknath Shinde : शिंदे सत्तेपासून दूर राहणार; भाजपच्या ऑफरला दाखवली केराची टोपली; उपमुख्यमंत्रिपदासाठी दोन नावं सूचवणार

जिल्ह्यातील सहकार क्षेत्र महाडिक पाटील कोरे आणि मुश्रीफ यांच्या भोवतीच फिरत आहे. मागील गोकुळ दूध संघात महाडिक यांना बाजूला करण्यासाठी हे तिघेही एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. मात्र सध्याची राजकीय दिशा पाहता सहकारी संस्थेतील राजकारणाला वेगळी दिशा मिळणार आहे. अशा परिस्थितीमुळे सहकारातील दोस्ती बिघडणार की टिकणार याची चर्चा आता जिल्ह्यात सुरू आहे.

Kolhapur Politics
Bharat Gogawale : 'कोट' शिवून तयार..असं म्हणणारे भरतशेठ आतातरी मंत्री होतील का?

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पालकमंत्री हसन मुश्रीफ, काँग्रेस नेते सतेज पाटील आणि माजी मंत्री आणि आमदार विनय कोरे यांचे रणनीती पाहता या तिघांनीही एकमेकांच्या विरोधात बोलणे नव्हे तर यांच्या मतदारसंघात प्रचाराला देखील जाणे पसंत केले नाही.

अंडरस्टँडिंग पॉलिटिक्समुळे तिघांची मैत्री पुन्हा चर्चेत आली आहे. बटेंगे तो कटिंग, एक हे तो सेफ है असा नारा देत महायुतीतील दहा आमदार सत्तेत आले असले तरी सहकारात हा नारा नसला तर सहकारातील मैत्री कायम राहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com