Manoj jarange Patil, Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar : मनोज जरांगे पाटलांचा माघारीचा निर्णय योग्य की अयोग्य? शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया…

Manoj Jarange Patil Assembly Election : मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत आपल्या मागण्या मान्य करणाऱ्या उमेदवाराच पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

Rajanand More

Mumbai : मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत एकही उमेदवार उतवणार नसल्याचे जाहीर केले आहे. महाविकास आघाडीतील बहुतेक नेत्यांनी या निणयाचे स्वागत केले असून त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

महाविकास आघाडीच्या सांगण्यावरून या घडामोडी घडत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, याच्याशी कुणाचाही काही संबंध नाही. हा निर्णय त्यांचा (जरांगे पाटील) आहे. पूर्वीचाही निर्णय त्यांचा होता. त्यांच्या निर्णयाचा मला आनंद आहे. तो एवढ्यासाठी की, ते सतत सांगतात भाजपला आमचा विरोध आहे. या पध्दतीने उमेदवार ठेवले असते तर त्याचा लाभ भाजपला झाला असता. त्या पार्श्वभूमीवर त्यांचा निर्णय योग्य आहे.

रश्मी शुक्ला यांना निवडणूक आयोगाने पोलिस महासंचलाक पदावरून हटवले आहे. त्यावरही शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे. ज्या व्यक्तीचा कार्यकाळ संपला आहे, त्यांच्याबद्दलल जाहीरपणे अनेक लोक बोलतात, की सत्तेचा गैरवापर केला. त्यांना मुदतवाढ देऊन त्यांच्या नियंत्रणाखाली निवडणूक घेण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न योग्य नव्हता. त्यामुळे निवडणूक आयोगाने हा निर्णय योग्य घेतला आहे. आता या पदावर त्या कायमचा राहता कामा नयेत.

मैत्रीपूर्ण लढती नाहीत

दरम्यान, मैत्रीपूर्ण लढतीच्या मार्गाने जाण्याची आमची इच्छा नसल्याचे शऱद पवारांनी स्पष्ट केले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आता केवळ काही मिनिटे उरली आहेत. त्याआधी मुंबईतील त्यांच्या घरी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे पोहचले. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत बंडखोरांच्या मनधरणीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT