Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Maharashtra Exit Polls : मोठी बातमी: अपक्षांचा भाव वधारणार; सत्ता स्थापनेसाठी महायुती घेणार मदत

Independents gain momentum Mahayuti to seek their support for power: महायुती आणि महाविकास आघाडीत काँटे की टक्कर असल्याचं 'एक्झिट पोल'मध्ये दिसून आले आहे. 10 ते 15 अपक्ष आमदार निवडून येण्याची शक्यता आहे.

Mangesh Mahale

Mumbai News: महायुती सरकारमधील शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आगामी सत्ता स्थापनेबाबत मोठ विधान केले आहे. गरज पडल्यास सत्तास्थापनेसाठी महायुती अपक्षांची मदत घेणार, असे दीपक केसरकर म्हणाले. विविध एक्झिट पोलच्या अंदाजानुसार 10 ते 15 अपक्ष आमदार निवडून येण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलने अपक्ष आमदाराबाबत केलेल्या दाव्यानंतर दीपक केसरकर यांनी विधान केले आहे.

महायुती आणि महाविकास आघाडीत काँटे की टक्कर असल्याचं 'एक्झिट पोल'मध्ये दिसून आले आहे. 10 ते 15 अपक्ष आमदार निवडून येण्याची शक्यता असल्याने निवडून येणारे अपक्ष आमदारांचा चांगलाच 'भाव'मिळणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. महाराष्ट्रात 288 विधानसभा जागांसाठी मतदान झाल्यानंतर एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत.

राज्यातील विधानसभा निवडणुकीबाबत 5 एक्झिट पोल समोर आले असून यात राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन होईल असा अंदाज चार एक्झिट पोलने वर्तवला आहे. पाचही एक्झिट पोलचा एकत्रित निकाल पाहिल्यास महायुतीला 150 आणि महाविकास आघाडीला 120 जागा मिळतील. अन्य पक्षांना 18 जागा मिळतील, असा अंदाज आहे.

असे आहेत एक्झिट पोल...

पोल डायरी एक्झिट पोल...

महायुती - १२२-१८६

मविआ - ६९- १२१

इलेक्टोरल एज एक्झिट पोल

महायुती - ११८

मविआ - १५०

चाणक्यचा एक्झिट पोल

महायुती - १५२-१६०

मविआ - १३०-१३८

पी मार्क्यू एक्झिट पोल

महायुती - १३७-१५७

मविआ -१२६-१४६

रिपब्लिक एक्झिट पोल

महायुती - १३७-१५७

मविआ -१२६-१४६

SAS एक्झिट पोल

महायुती - 127-135

मविआ -147-155

मॅट्रिझ एक्झिट पोल...

महायुती - १५०-१७०

मविआ - ११०-१३०

लोकशाही महारुद्र

महायुती - १२८-१४२

मविआ - १२५-१४०

इतर - १८-२३

पीपल्स पल्स एक्झिट पोल

महायुती - 175-195

मविआ - 85-112

इतर - 07-12

भास्कर रिपोर्टर्स पोल

महायुती - १२५-१४०

मविआ - १३५- १५०

इतर - २०-२५

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT