Mumbai News : यंदाची विधानसभा निवडणूक ही अतिशय अटीतटीची होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीसाठी तर अस्तित्वाची लढाई म्हणून या निवडणुकीकडे राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता महाराष्ट्राची जनता कुणाला सत्तेच्या खुर्चीवर बसवणार याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
त्यातच 'एक्झिट पोल'मध्ये महायुती आणि महाविकास आघाडीत काँटे की टक्कर असल्याचं दिसून येत आहे. तर अपक्षांची संख्याही जास्त असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, अपक्ष युती व आघाडीची झोप उडवणार असल्याची चर्चा आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला धोबीपछाड दिला होता.पण आता विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) महायुतीने जोरदार कमबॅक केल्याचं पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत महायुतीत भाजप आणि महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता एक्झिट पोलच्या अंदाजात व्यक्त करण्यात आली आहे.
तसेच मनसे, वंचित, रासप यांच्या पक्षांच्या जागा एक्झिट पोलमध्ये समोर आल्या नसल्या तरी अपक्षांसह त्यांची भूमिका किंगमेकरची ठरण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या एक्झिट पोल्सने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) सभेला होणारी गर्दीचं मतात रुपांतर करण्यात पुन्हा एकदा अपयश आल्याचं दिसून येत आहे. राज ठाकरेंच्या मनसेला मिळणार असलेल्या जागांचा थेट आकडा सांगण्यात आला नसला तरी त्यांच्या जवळपास 150 जागा लढवलेल्या मनसेला भरघोस यश मिळणार नसल्याचं पाहायला मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया बुधवारी (ता.21) पार पडल्यानंतर सायंकाळी वेगवेगळ्या एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. त्यात अपक्षांना मिळणार असलेल्या जागांबाबतचाही कल देण्यात आला आहे. दैनिक भास्करच्या एक्झिट पोलमध्ये अपक्षांना 20 ते 25 दरम्यान जागा मिळणार असल्याचं दिसून येत आहे. तर पोल डायरीमध्ये मनसे,वंचित,एमआयएमसह अपक्षांच्या पारड्यात 12-29 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आली आहे.
'इलेक्टोरल एज'च्या पोलमध्ये अपक्षांना 19 ते 20 दरम्यान जागा मिळणार असल्याचं सांगितलं आहे.तर,पिपल्स पल्स 7 ते 12,पोल डायरी 12 ते 29,लोकशाही मराठी रुद्र 18 ते 23,दैनिक भास्कर 20 ते 25,टाईम्स नाऊ 12 ते 13 ,एसएएस हैदराबाद 10 ते 13, चाणक्य स्ट्रॅटेजी 6 ते आणि मॅट्रिजने 8 ते 10, पिपल्स पल्सच्या पोलच्या अंदाजात 7 ते 12 जागाच अपक्षांना मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.
राज्यात महायुतीला 152 जागा तर महाविकास आघाडीला 126 जागांवर विजय मिळण्याची शक्यता 'पोल ऑफ पोल' च्या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आली आहे. तसेच इतरांना 10 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर झी AI च्या एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडीला सर्वात मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.