ajit pawar eknath shinde devendra fadnavis sarkarnama
मुंबई

Assembly Monsoon Session 2024 : 'या' दोन कारणांमुळे पावसाळी अधिवेशन पुढं ढकललं

Assembly Session : फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं. अधिवेशन स्थगित करताना पुढील अधिवेशन 10 जूनला पार पडणार असल्याची घोषणा करण्यात आली होती

Akshay Sabale

Mumbai News, 1 June : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ( Assembly Monsoon Session ) 10 जूनपासून सुरू होणार होते. पण, ते पुढे ढकलण्यात आल्याचं समोर आलं आहे. विधानपरिषदेच्या चार जागांची निवडणूक संपल्यानंतर जुलै महिन्यात हे अधिवेशन होण्याची शक्यता आहे. अधिवेशनाबाबत अंतिम निर्णय विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेतला जाणार आहे.

सध्या देशात लोकसभा निवडणुकीची ( Lok Sabha Election 2024 ) रणधुमाळी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला येईल. त्यानंतर नवी लोकसभा स्थापन झाल्यानंतर लोकसभेची आचारसंहिता संपुष्टात येईल.

पण, राज्यात विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा चार जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात नाशिक, कोकण आणि मुंबई या भागात आचारसंहिता कायम राहणार आहे. त्यामुळे विधिमंडळ अधिवेशन पुढे ढकलण्यात आलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं. अधिवेशन स्थगित करताना पुढील अधिवेशन 10 जूनला पार पडणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. राज्यात 20 मे रोजी लोकसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा पार पडला.

त्यानंतर 21 मे रोजी सल्लागार समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. पण, मतदान संपले तरी सत्ताधारी मंडळी निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत, तर काही नेते परदेशवारीवर गेले आहेत, त्यामुळे कामकाज सल्लागार समितीची बैठकच झाली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT