Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : लोकसभेतील 'हे' 13 मतदारसंघ ठरवणार शिवसेना कुणाची... ठाकरे की शिंदेंची?

Shivsena Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर शिवसेनेची दोन शकले उडली. त्यानंतर दोन्ही बाजूने खरी शिवसेना आम्हीच असल्याचा दावा केला जात आहे.
Eknath Shinde, Uddhav Thackeray
Eknath Shinde, Uddhav ThackeraySarkarnama

Maharashtra Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर शिवसेनेची दोन शकले उडली. त्यानंतर दोन्ही बाजूने खरी शिवसेना आम्हीच असल्याचा दावा केला जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातही या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने आले.

महाराष्ट्रातील 13 लोकसभा मतदारसंघ असे आहेत, ज्या ठिकाणी दोन्ही शिवसेना एकमेकींना भिडल्या. त्यामुळं त्या 13 मतदारसंघांचा निकाल ठरवणार शिवसेना कुणाची? ठाकरेंची की शिंदेंची?

शिवसेने फुटीनंतरची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक! शिवसेना फुटली आणि तिचे दोन गट पडले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तर दुसरा शिवसेना एकनाथ शिंदे गट. पुढं कोर्ट कचेऱ्या झाल्या, निकाल लागला आणि शिंदेंच्या नेतृत्वातील पक्षाला ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्हही मिळालं. मात्र ‘खरी शिवसेना’ आमचीच हा उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांचा दावा आजही कायम आहेच. अखेर लोकसभा निवडणूक लागली आणि दोन्ही शिवसेनेचे उमेदवार 13 मतदारसंघांत एकमेकांना भिडले. आता हे 13 मतदारसंघ ठरवतील खरी शिवसेना कुणाची?

Eknath Shinde, Uddhav Thackeray
Sharad Pawar Vs Ajit Pawar : सुनील तटकरेच अजितदादांची साथ सोडणार, शरद पवार गटाच्या नेत्यांनं पेटवली वात

कोणते आहेत ते मतदारसंघ..

1. बुलडाणा : प्रतापराव जाधव (शिंदे गट) Vs नरेंद्र खेडेकर (ठाकरे गट)

2. यवतमाळ - वाशिम : राजश्री पाटील (शिंदे गट) Vs संजय देशमुख (ठाकरे गट)

3. हिंगोली : बाबूराव कदम (शिंदे गट) Vs नागेश पाटील आष्टीकर (ठाकरे गट)

4. हातकणंगले : धैर्यशील माने (शिंदे गट) Vs सत्यजीत पाटील (ठाकरे गट)

5. मावळ : श्रीरंग बारणे (शिंदे गट) Vs संजोग वाघेरे-पाटील (ठाकरे गट)

6. शिर्डी : सदााशिव लोखंडे (शिंदे गट) Vs भाऊसाहेब वाकचौरे (ठाकरे गट)

Eknath Shinde, Uddhav Thackeray
Manoj Jarange News : जरांगेंचं ठरलं, महायुती-मविआचं टेन्शन वाढलं; 288 उमेदवार उभे करणार

7. छ. संभाजीनगर : संदिपान भुमरे (शिंदे गट) Vs चंद्रकांत खैरे (ठाकरे गट)

8. नाशिक : हेमंत गोडसे (शिंदे गट) Vs राजाभाऊ वाजे (ठाकरे गट)

9. कल्याण : श्रीकांत शिंदे (शिंदे गट) Vs वैशाली दरेकर (ठाकरे गट)

10. ठाणे : नरेश म्हस्के (शिंदे गट) Vs राजन विचारे (ठाकरे गट)

11. मुंबई दक्षिण : यामिनी जाधव (शिंदे गट) Vs अरविंद सावंत (ठाकरे गट)

12 मुंबई दक्षिण मध्य : राहुल शेवाळे (शिंदे गट) Vs अनिल देसाई (ठाकरे गट)

13. मुंबई उत्तर पश्चिम : रवींद्र वायकर (शिंदे गट) Vs अमोल कीर्तीकर (ठाकरे गट)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Eknath Shinde, Uddhav Thackeray
Zadani Land Case : झाडाणीप्रकरणी आयुक्तांसह तिघांना नोटीस; 11 जूनला साताऱ्यात सुनावणी

एकूणच काय तर कधीकाळी एकाच पक्षात, काम करणारे नेते या लोकसभा निवडणुकीला एकमेकांविरुद्ध उभे ठाकले. आता उद्धव ठाकरेंच्या मागे शिवसैनिक आहेत की एकनाथ शिंदेंच्या Eknath Shinde मागे याचं उत्तर आता लोकसभा निवडणुकीच्या निकालातून खऱ्या अर्थानं मिळणार आहे. त्यामुळं येत्या 4 जूनलाच कळणार शिवसेना कुणाची? ठाकरेंची की शिंदेंची?

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com