Monsoon Adhiveshan 2023  Sarkarnama
मुंबई

Maharashtra Monsoon Session LIVE थोरातांचा प्रस्ताव नार्वेकरांनी फेटाळला ; शेतकऱ्यांच्या मुद्यांवरून विरोधक आक्रमक

सरकारनामा ब्यूरो

Monsoon Session of Maharashtra Assembly 2023 : महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास सुरवात झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्थगन प्रस्ताव आणला. मात्र हा प्रस्ताव अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फेटाळला. त्यानंतर विरोधकांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. त्यानंतर विरोधी पक्षाने सभात्याग केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारला पाठिंबा देत मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिलेच अधिवेशन आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षांच्या आमदारांची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधक आक्रमक झाले आहेत.

अधिवेशनाच्या सुरवातीला बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधलं. "सरकारचे शेतकऱ्यांकडे लक्ष नाही, शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकारकडून कुठलीही मदत नाही. राज्यात अद्यापपर्यंत फक्त २० टक्के पेरण्या झाल्या आहेत. पावसाने ओढ दिल्याने दुबार पेरणीचं संकट आहे," थोरात यांचा स्थगन प्रस्ताव मांडत राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. मात्र,अध्यक्षांनी हा प्रस्ताव फेटाळला.

दरम्यान विरोध पक्ष नेते पदाच्या निवडीसाठी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक सुरू झाली आहे. "विरोधी पक्ष नेता हा काँग्रेसचाच होईल," असे बाळासाहेब थोरात यांनी अधिवेशनापूर्वी पत्रकारांना सांगितले.

"अदानीला धारावी मिळते, शेतकऱ्यांना काय मिळाले? असा सवाल आमदार यशोमती ठाकूर यांचा सरकारला केला आहे. विधीमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन करीत असताना त्या बोलत होत्या. 'घटनाबाह्य कलंकीत सरकारचा धिक्कार' अशा प्रकारचे फलक आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यावर दाखवले आहेत.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT