Bachchu Kadu News : "बच्चू कडूंना मंत्री करा"; कार्यकर्त्यानं मुख्यमंत्री शिंदेंना लिहिलं रक्तानं पत्र..

Blood Letter To CM From Bachchu Kadu Activists: बच्चू कडू हे आज मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेणार आहेत.
Bacchu Kadu, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Bacchu Kadu, Eknath Shinde, Devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on

Solapur News: मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले आक्रमक अपक्ष आमदार बच्चू कडू सध्या नरमले आहेत. बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद घेऊन मंत्रिपदावर यापुढे दावा करणार नसल्याचे सांगितले . मंत्रिपदासाठी शिवसेना आणि भाजप आमदारांमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच आता बच्चू कडूंना मंत्रीपद द्यावे, अशी विनंती त्यांच्या कार्यकर्त्यांने मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. यासाठी या कार्यकर्त्याने चक्कं स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिलं आहे. दिपक लांडगे (रुई, ता. माढा) असे या कार्यकर्त्यांचं नाव आहे.

Bacchu Kadu, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Rahul Kalate Shinde Group News: अमावस्येमुळे राहूल कलाटेंचा प्रवेश तूर्तास अडला..; कलाटेंच्या मनात शिंदेच होते..

"आमदार बच्चू कडू यांना सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी राज्य मंत्री मंडळात प्राधान्याने स्थान‌ द्यावे," अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या या पत्रात करण्यात आली आहे. दिपक लांडगे यांच्या या पत्राची सोलापूर जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सर्वाधिक प्रतिक्रिया देऊन आक्रमक भूमिका मांडणारे शिंदे गटातील आमदार बच्चू कडू हे आज (सोमवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दहा वाजताच्या सुमारास भेट घेणार आहेत.

मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याने कडू यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली असून पत्रकार परिषद घेऊन मंत्रिमंडळात स्थान नको, मी आता मंत्रिमंडळ विस्तारावरचा दावा सोडतो या निर्णयापर्यंत ते आले आहे. मात्र तत्पूर्वी आज मुंबईत बच्चू कडू यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत बैठक होणार आहे . या बैठकीनंतर बच्चू कडू उद्या (मंगळवारी) आपली भूमिका जाहीर करणार आहेत.

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या सहभागामुळे मंत्रिपदाची गणिते बदलली आहेत. आपली संधी हुकणार असल्याने कडू हे नाराज आहेत. "मंत्री व्हावं असं कोणाला वाटतं नाही. पण काल रात्री मी एक प्रार्थना ऐकली. 'इतनी शक्ती हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर हो ना… ही ती प्रार्थना होती. ती ऐकून माझं मत बदललं. मला वाटलं हे सगळं कशासाठी करायचं? पुन्हा त्या रांगेत का बसायचं?,’ असा सवाल बच्चू कडू यांनी दोन दिवसापूर्वी उपस्थित केला आहे.

Bacchu Kadu, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Ahmednagar NCP News: हल्ल्यात जखमी झालेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा मृत्यू : भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदेसह पाच जणांना अटक

राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून (सोमवार) सुरू होत आहे. या अधिवेशनापूर्वीच राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलेली आहेत. यापूर्वी अर्थसंकल्प अधिवेशनात अजित पवार हे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते होते. आता अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे १५ दिवस सुरू राहणाऱ्या पावसाळी अधिवेशन विरोधक कोण-कोणत्या मुद्यांवरून सरकारची कोंडी करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून ते ४ ऑगस्टपर्यंत आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com