CM Eknath Shinde Latest News, Devendra Fadnavis News, Ajit Pawar News Sarkarnama
मुंबई

एकनाथ शिंदे पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख करता करता थांबले!

अजित पवार बनले विरोधी पक्षनेते...

सरकारनामा ब्युरो

मुंबई : विधासनभेतील विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नावाची अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घोषणा केली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजितदादांचे अभिनंदन केले. शिंदे यांनी आपल्या भाषणात तोंडभरून कौतुक केलं. पण भाषण करत असताना पहाटे शपथविधीचा उल्लेख करता करता ते थांबले अन् सभागृहात एकच हशा पिकला. (Eknath Shinde Latest Marathi News)

अजितदादांचं अभिनंदन करताना शिंदे यांनी अजिदादांच्या कामाचं कौतुक केलं. यावेळी ते लिखित भाषण वाचत होते. सलग सातवेळा निवडून येण्याचा पराक्रम अजितदादांनी केला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अशी अनेक पदं भूषविली आहेत, असं बोलून झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील भाजप-राष्ट्रवादी... हे वाक्य येताच शिंदे थांबले. 'नाही ते नको,' असं म्हणून शिंदे यांनी त्यावर बोलणे टाळलं.

शिंदे यांनी असं बोलताच काही सेकंद फडणवीसांनाही काळी कळालं नाही. पण नंतर त्यांनाही हसू आवरलं नाही. सभागृहात एकच हशा पिकला. काही सदस्यांनी बोला, बोला असं म्हणत शिंदे यांना पुढे बोलण्याचा आग्रह केला. पण शिंदे यांनी त्यावर न बोलता पुढे लिहिलेलं वाचण्यास सुरूवात केली. 2019 मध्ये महाविकास आघाडी स्थापन होण्यापूर्वी फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.

अजितदादांनी महत्वाची पदं भूषवली आहेत. त्यांच्या भाषणाची शैली सगळ्यांना माहिती आहे. शरद पवारसाहेबांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. त्यांनी अजित पवारांवर ही जबाबदारी दिली आहे. सत्ताधारी पक्षाएवढाच विरोधी पक्षनेत्याचा सन्मान ठेवावा लागतो. तो ठेवला जाईल. विरोधी पक्षनेता जनतेची न्याय बाजू सभागृहा व सभागृहाबाहेर मांडणारा नेता असतो. परंतु आजची परिस्थिती वेगळी आहे. कालपर्यंत सत्तेत असलेली मंडळी आता विरोधात आहेत. त्यामुळे काम करणं आणखी सोपं जाईल, असं शिंदे म्हणाले.

तरूणांनादेखील हेवा वाटावा असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. रोखठोक आणि हजरजबाबी नेता आहे. दादांकडे बैठक असली की वेळेतच जातो. ते त्यांच्या मतदारसंघात विलक्षण लोकप्रिय आहेत. अजितदादांनी मताधिक्य टिकवून ठेवले आहे. अजितदादांनी प्रत्येक खात्यात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. त्यांचा ठसा मजबूत असतो. त्यांची शिस्त, वेळापत्रक, त्यात एक मिनिटंही इकडे तिकडे होत नाही, असं शिंदे यांनी नमूद केलं.

सगळ्या जास्त वेळ मंत्रालयात बसलेला मंत्री म्हणजे अजितदादा. समाजकारण आणि राजकारणात यशस्वी नेते आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. आज विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी नवी इनिंग सुरू केली आहे, अशी शब्दांत शिंदे यांनी अजितदादांना शुभेच्छा दिल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT