Maharashtra Assembly Session 2024 Sarkarnama
मुंबई

Maharashtra Assembly Session : '40 टक्के सरकार हाय हाय'; म्हणत सभागृहात जाण्याआधीच सरकारविरोधात आघाडीच्या नेत्यांचा 'एल्गार'

Maharashtra Assembly Session 2024, MVA Vs Mahayuti : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला काही वेळात सुरुवात होणार आहे. मात्र, सर्व आमदार सभागृहात जाण्यापूर्वीच अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी सरकारच्या विरोधात पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली.

Jagdish Patil

Mumbai News, 27 June : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला काही वेळात सुरुवात होणार आहे. मात्र, सर्व आमदार सभागृहात जाण्यापूर्वीच अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी सरकारच्या विरोधात पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली.

शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, '40 टक्के सरकार हाय हाय', '40 टक्के टक्केवारी घेणारं सरकार हाय हाय', असं म्हणत महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी आमदारांनी हातामध्ये वेगवेगळे पोस्टर्स घेतले होते. ज्यावर, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकरी विरोधी महायुती सरकारचा धिक्कार असो, अशा आशयाचा मजकूर लिहिण्यात आला होता.

पायऱ्यांवर सरकारविरोधी घोषणाबाजी करणाऱ्या नेत्यांमध्ये काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, आमदार सतेज पाटील, भाई जगताप, यशोमती ठाकूर, रवींद्र धंगेकर यांचा समावेश होता.

महायुती सरकारच्या कार्यकाळातील हे शेवटचं अधिवेशन आहे. तर लोकसभा निवडणुकीच्या निकालातून राज्यातील जनतेचा युती सरकारवरील रोष लक्षात घेता, या अधिवेशानात सरकारची कोंडी करण्याची एकही संधी न सोडण्याचा पवित्रा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला आहे. त्याची चुणूक अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून पाहायला मिळत आहे. त्यामुळे हे अधिवेशन चांगलंच वादळी होणार यात शंका नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT