Maharashtra Politics : मोठी बातमी! राज्य सरकारची नजर राज्यपाल नियुक्त 12 आमदारांवर, विधानसभेपूर्वी हालचालींना वेग

MLA Appointed by Governor : विधानपरिषद निवडणुकीनंतर आता राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीबाबत राज्य सरकारने हालचाली सुरु केल्याची माहिती आहे.
Mahayuti, Maha vikas Aghadi
Mahayuti, Maha vikas AghadiSarkarnama

Mumbai News, 27 June : लोकसभेच्या पराभवाची कारणमिमांसा, विधानसभेसाठीची रणनीती करण्यात व्यग्र असलेल्या महायुती सरकारने आता आपली नजर राज्यपाल नियुक्त आमदारांकडे वळवली आहे.

विधानपरिषद निवडणुकीनंतर आता राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीबाबत राज्य सरकारने हालचाली सुरु केल्याची माहिती आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी राज्य सरकार राज्यपाल नियुक्त आमदारांची निवड करुन नवीन डाव टाकण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या (MVA) काळात तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी 12 आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग अडवला होता. यावरुन बराच वादंग झाला होता. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेलं. याच प्रकरणी 4 जुलै रोजी महत्वाचा निर्णय होणार आहे. त्याआधीच महायुती सरकारने या बारा आमदारांच्या निवडीबाबत हालचाली सुरु केल्या आहेत.

Mahayuti, Maha vikas Aghadi
Maharashtra Assembly Session 2024: विरोधकांना चितपट करण्यासाठी महायुती सरकार अधिवेशनात 'हा' डाव टाकणार?

तर या 12 आमदारांमध्ये भाजप (BJP) स्वतःसाठी जास्त वाटा घेण्याच्या तयारीत असल्याचंही बोललं जात आहे. आघाडी सरकारच्या काळात घटक पक्षांच्या वाट्याला प्रत्येकी 4 जागा आल्या होत्या. तर आता महायुतीतील घटक पक्षांच्या वाट्याला किती जागा येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. शिवाय या जागांच्या वाटपावरूनही युतीत मतभेद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com