Pravin Darekar celebrates with supporters after his BJP-backed panel wins all seats in the Maharashtra Boxing Association elections. Sarkarnama
मुंबई

Pravin Darekar news : प्रवीण दरेकरांच्या ठोश्याने विरोधकांचे पानिपत; 'या' निवडणुकीत अध्यक्षपदासह सर्व 29 जागांवर दणदणीत विजय

Pravin Darekar’s Panel Sweeps Maharashtra Boxing Association Elections : निवडणुकीसाठी प्रवीण दरेकर आणि बॉक्सिंग प्रशिक्षक जय कवळी यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल उभे करण्यात आले होते. दरेकर हे अध्यक्षपदासाठी रिंगणात होते.

Rajanand More

BJP’s Stronghold Expands Beyond Politics Into Sports Bodies : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या भाजपला माघार घ्यावी लागली असली तरी महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या निवडणुकीत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी बाजी मारली आहे. असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवढणुकीत ते बहुमताने विजयी झाले असून त्यांच्या पॅनेलच्या सर्व 27 उमेदवारांनीही दणदणीत विजय मिळवला आहे.

बॉक्सिंग असोसिएशनची वार्षिक निवडणूक रविवारी पार पडली. मुंबईतील वरळी येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयात सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत मतदान आणि त्यानंतर मतमोजणी पार पडली. अध्यक्षपदासह 16 उपाध्यक्ष, महासचिव, खजिनदार, कार्यकारी सचिव, व्यवस्थापकीय सदस्य आणि विभागीय सचिव या पदांसाठी निवडणूक झाली.

निवडणुकीसाठी प्रवीण दरेकर आणि बॉक्सिंग प्रशिक्षक जय कवळी यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल उभे करण्यात आले होते. दरेकर हे अध्यक्षपदासाठी रिंगणात होते. भाजपने नेते आशिष शेलार, प्रसाद लाड यांनीही त्यांच्या विजयासाठी प्रयत्न केले होते. दरेकर यांच्याविरोधात रणजीत सावकर हे मैदानात होते. यामध्ये दरेकरांनी बाजी मारत अध्यक्षपद काबीज केले आहे. सावरकर हे असोसिएशनचे माजी अध्यक्ष आहेत.

दरम्यान, दरेकर यांच्या पॅनेलचे काही उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. त्यामध्ये खजिनदार, आठपैकी सहा विभागीय सचिव बिनिविरोध निवडून ले होते. उपाध्यक्षपदासाठी 23 उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत दरेकर यांच्या पॅनेलच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला आहे. दरेकर यांच्यासोबत असलेले जय कवळी हे असोसिएशनचे माजी अध्यक्ष आहेत.

दरम्यान, या विजयानंतर दरेकर यांनी सोशल मीडियात पोस्ट करत म्हटले आहे की, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या निवडणुकीत मी अध्यक्ष पदी बहुमताने विजयी झालो. महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे माजी अध्यक्ष जय कवळी आणि माझ्या पॅनलने सर्वच्या सर्व 27 जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवत विजय संपादित केला. मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून राज्यातील बॉक्सिंगला पुन्हा वैभवाचे दिवस नक्की आणू, असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT