

Ayodhya Ram Temple: RSS Clarifies Its Stand : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी खळबळ उडवून देणारे विधान केले आहे. संघ कोणत्याही व्यक्ती किंवा राजकीय पक्षाचे समर्थन करत नाही, तर धोरणांचे समर्थन करतो. आम्ही राष्ट्रनीतीचे समर्थक आहोत, राजनीतीचे नाही, असे विधान करताना मोहन भागवत यांनी काँग्रेसचाही उल्लेख केला.
बेंगलुरू येथील एका कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत यांच्या विधानामुळे चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपमधील नाते वेगळे सांगण्याची गरज नाही. कार्यक्रमात त्यांना राजकीय पक्षांबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना केलेल्या विधानामुळे उपस्थितही अवाक झाले.
काय म्हणाले मोहन भागवत?
राजकीय पक्षांविषयी बोलताना सरसंघचालक म्हणाले, आम्ही कोणत्याही एका राजकीय पक्षाचे समर्थन करत नाही. आम्ही निवडणुकीच्या राजकारणात सहभाग घेत नाही. संघ समाजाला एकजुट करण्याचे काम करतो आणि राजकारण विभाजनकारी असेत. आम्ही धोरमांचे समर्थन करतो.
याचे उदाहरण द्यायचे झाले तर, आम्हाला अयोध्येत राम मंदिर हवे होते. त्यामुळे आमचे स्वयंसेवक त्याच्या उभारणीसाठी उभे राहिले. भाजपने हा मुद्दा उचलून धरला. जर काँग्रेसनेही याचे समर्थन केले असते तर आमच्या स्वयंसेवकांनी त्या पक्षाला मते दिली असती, असे विधान भागवत यांनी यावेळी केले.
कोणत्याही एका विशिष्ट पक्षासोबत आमचे विशेष संबंध नाहीत. कोणताही एक पक्ष आमचा नाही, सर्व पक्ष आमचे आहेत, कारण ते भारतीय पक्ष आहेत. आमचे काही विचार आहेत. देश एका विशिष्ट दिशेने पुढे जावा, असे आम्हाला वाटते. जे लोक देशाला त्या दिशेने पुढे घेऊन जातील, आम्ही त्यांचे समर्थन करू, असेही भागवत म्हणाले आहेत.
संघाची नोंदणी का नाही?
RSS ची नोंदणी का केली जात नाही, असा प्रश्न काँग्रेस नेत्यांकडून वारंवार उपस्थित केला जातो. त्याचेही उत्तर भागवत यांनी यावेळी दिले. ते म्हणाले, याचे उत्तर अनेकदा दिले गेले आहे. संघाची स्थापना १९२५ मध्ये झाली होती. तुम्ही आमच्याकडून ब्रिटिश सरकारकडे नोंदणीची अपेक्षा ठेवता? स्वातंत्र्यानंतर कायदे नोंदणीला बंधनकारक करत नाहीत. व्यक्तींच्या समुहालाही एक कायदेशीर दर्जा दिला जातो. आम्हाला व्यक्तींचा समूह म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. आम्ही एक मान्यताप्राप्त संघटना आहोत. आमच्यावर बंदीही घालण्यात आली होती. कोर्टाने ही बंदी उठवली. त्यामुळे आम्ही कायदेशीर आहोत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.