ajit pawar
ajit pawar sarkarnama
मुंबई

Video Maharashtra Budget Session 2024 : पेट्रोल-डिझेलचे दर होणार कमी; अजितदादांचा जनतेला मोठा दिलासा

Akshay Sabale

लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खालल्यानंतर पुढील निवडणुका जिंकण्यासाठी महायुती सरकारनं पावले टाकण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून अर्थसंकल्पातून मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांनी ( Ajit Pawar ) अर्थसंकल्पात महिला, शेतकरी, युवा, युवती, वारकऱ्यांसाठी मोठ्या योजनांची घोषणा केली आहे. यातच मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबत सरकारनं मोठा निर्णय जाहीर केला आहे.

अजित पवार म्हणाले, "सर्वसामान्य नागरिक आणि उद्योगांना दिलासा मिळण्यासाठी पेट्रोल-डिझेलच्या दरात समानता आणण्याची आवश्यकता होती. त्यादृष्टीनं बृहन्मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या महापालिका क्षेत्रातील डिझेलवरील कर 24 टक्क्यांवरून 21 टक्के करण्यात येणार आहे. तर, पेट्रोल 26 टक्क्यांवरून 25 टक्के कमी करण्यात येणार आहे."

"या बदलांमुळे बृहन्मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील पेट्रोलचा दर 65 पैसे, तर डिझेलचा दर 2 रूपये 7 पैसे प्रतिलिटर स्वस्त होणार आहे," अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे.

"केंद्रीय सशस्त्र दलात 7 दल कार्यरत आहेत. त्यापैकी सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलिस दलातील जवानांना व्यवसाय कर्ज भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. आसाम रायफल्स, औद्योगिक सुरक्षा दल, भारत तिबेट सीमा पोलिस दल, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक आणि सशस्त्र सीमा दलातील राष्ट्रीय कर्तव्य बजावणाऱ्या जवानांना व्यवसाय कर भरण्यापासून सूट देण्यात येणार आहे. याचा लाभ 12 हजार जवानांना होणार आहे," असं अजित पवारांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT