Maharashtra Budget 2024 : जयंत पाटीलसाहेब, आपल्यावेळेस पुढं जायचंच नाही ते! अजितदादांनी डिवचलं...  

Finance Minister Ajit Pawar Assembly Session 2024 : विधानसभा निवडणुकीआधीचा शेवटचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार सादर करत आहेत.
Jayant Patil, Ajit Pawar
Jayant Patil, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी रखडलेल्या जलसिंचन प्रकल्पांवरून अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना डिवचले.

विविध कारणांमुळे अपूर्ण राहिलेले जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मागील दोन वर्षांपासून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत 108 प्रकल्पांना ‘सुप्रमा’ (सुधारित प्रशासकीय मान्यता) देण्यात आल्याचे सांगताना अजितदादांनी जयंत पाटलांचे नाव घेतले.

Jayant Patil, Ajit Pawar
Maharashtra Monsoon Session 2024 LIVE Updates : तृतीयपंथीयांना राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घेता येणार

जयंत पाटील साहेब, आपल्यावेळेत पुढं जायचंच नाही ते, असे म्हणत अजित पवारांनी त्यांना चिमटा घेतला. येत्या दोन वर्षात 61 प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे. या प्रकल्पातून सुमारे ३ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे, असे अजित पवारांनी जाहीर केले.

महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम हाती घेण्यात येत असून या कार्यक्रमातून 155 प्रकल्पांच्या कालवे वितरण प्रणालीत सुधारणा करण्यात येणार आहे. त्यासाठी नाबार्डकडून 15 हजार कोटींचे दीर्घ मुदतीचे अर्थसहाय्य मंजूर झाले असून ते आपण कधीही उचलू शकतो, असेही अजितदादांनी स्पष्ट केले.

Jayant Patil, Ajit Pawar
Ajit Pawar Maharashtra Budget 2024: शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या बजेटमधील महत्वाच्या घोषणा; शेतकऱ्यांना वीज बिल माफ

वीजेचा खर्च कमी करण्यासाठी तसेच शाश्वत वीजपुरवठा करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथे पथदर्शी सौरऊर्जा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. सांगलीसह सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 75 हजार शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली. यावेळीही त्यांनी सत्ताधाऱ्यांकडे सूचक नजर टाकली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com