Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis: 25 वर्षे मी सभागृहात..पहिल्यांदा असं होतंय! फडणवीस विधिमंडळात हतबल: काय घडलं?

Maharashtra Budget Session 2025 Live:आमदारांच्या गैरहजेरीवरून मुख्यमंत्र्यांची खंत व्यक्त केली सुरुवातीच्या तिन्ही प्रश्नाला आमदारच नसल्याने फडणवीस हतबल झाले.

Mangesh Mahale

Mumbai Political News: विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विरोधकांनी मांडलेल्या विविध मुद्यांना उत्तरे देणार आहेत. आज सकाळी सभागृहाचे कामकाज सुरु झाले. यावेळी प्रश्नोत्तराच्या तासाला अनेक आमदारांनी दांडी मारल्याचे चित्र होते.प्रश्न विचारणारे आमदारच गैरहजर असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली.

आमदारांच्या गैरहजेरीवरून मुख्यमंत्र्यांची खंत व्यक्त केली. २५ वर्षे मी सभागृहात आहे.पहिल्यांदा असं होतंय की पहिले प्रश्न विचारणारे सदस्यच उपस्थित नाहीत, असे फडणवीस म्हणाले. सुरुवातीच्या तिन्ही प्रश्नाला आमदारच नसल्याने फडणवीस हतबल झाले.

सभागृहात कामकाज सुरु होताना प्रश्न विचारणारे आमदार उपस्थित नसल्याने फडणवीसांनी आश्चर्य व्यक्त केले." 25 वर्षे मी सभागृहात आहे.पहिल्यांदा असं होतंय की पहिले प्रश्न विचारणारे सदस्यच उपस्थित नाही. काल आणि आजही प्रश्न विचारणे आमदार गैरहजर होते, हे अतिशय गंभीर आहे.

या सभागृहातून विचित्र मॅसेज जायला नको.याची काळजी घ्या," असा सल्ला फडणवीसांनी उपस्थिता सदस्यांना दिला. या सभागृहातून चुकीचा मेसेज बाहेर जाऊ नये, ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळे सदस्यांनी उपस्थित राहायला हवे, असे त्यांनी सांगितले.

विधानसभा उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची निवड होण्याची दाट शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभा उपाध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारअण्णा बनसोडे यांनी अर्ज भरला आहे. बनसोडे यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. बुधवारी त्यांच्या निवडीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

  • सत्ताधारी पक्षाकडे 236 जागांचं भक्कम बहुमत आहे.

  • विरोधकांकडे 52 आमदारांचं संख्याबळ आहे.

  • अण्णा बनसोड यांची निवड निश्चित मानली जातेय..

  • विरोधकांकडे संख्याबळ नसल्यानं त्यांनी उमेदवार दिलेला नाही विधानपरिषदेचं सभापतीपद भाजपकडे गेलं आहे.

  • विधानसभेचे उपाध्यक्षपद राष्ट्रवादीला देण्याचं निश्चित झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT