Budget Session : राज्य विधीमंडळाचं सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून आज विधानपरिषदेत भाजपच्या दोन आमदारांमध्ये जुंपल्याचं पहायला मिळालं. यापैकी एक जण मंत्री असून या मंत्र्याच्या विभागात तब्बल ५०० कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळं एकच खळबळ उडाली असून नेमकं हे प्रकरण काय आहे? जाणून घेऊयात.
भाजपचे विधानपरिषद सदस्य परिणय फुके यांनी भाजपच्याच मंत्र्यांच्या विभागावर शेकडो कोटी रुपयांच्या निविदा गैरव्यवहाराचा आरोप विधानपरिषद सभागृहात लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून केला. इतर मागासवर्गीय (ओबीसी) कल्याण विभागाच्या अंतर्गत असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमध्ये (महाज्योती) भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप त्यांनी केला. कौशल्य विकासाच्या नावाखाली काही काळापासून शेकडो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार सुरू असल्याचे फुके यांनी सांगितले.
यावर ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी फुके यांचे आरोप फेटाळून लावले. महाज्योतीचा अर्थसंकल्प सुमारे २०० कोटी रुपयांचा असल्याने ५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप तर्कसंगत वाटत नाही. ही कंपनी इतर विभागांतही अशा प्रकारची कामे करत आहे. मात्र, सदस्यांनी व्यक्त केलेल्या शंकांचा विचार करून कंपनीच्या मालकीबाबत तपास केला जाईल, असे सावे यांनी स्पष्ट केले. सरकार कोणत्याही सरकारी निविदा प्रक्रियेत अनियमितता होऊ देणार नाही आणि सदस्यांनी व्यक्त केलेल्या चिंता दूर केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.