Mumbai News, 12 Dec : महायुती सरकारचा शपथविधी पार पडून आठवडा उलटला तरीहा अद्याप खातेवाटपाचा तिढा सुटलेला नाही. 5 डिसेंबरला झालेल्या शपथविधी सोहळ्यात केवळ तिघांनी शपथ घेतली होती. यामध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवारांनी शपथ घेतली.
तेंव्हापासून महायुती (Mahayuti) सरकारमधील घटक पक्षांच्या वाट्याला किती मंत्रिपदं येणार याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच आता महायुतीच्या मंत्रिपदांचा फार्म्युला जवळपास निश्चित झाल्याचं विश्वसनीय सुत्रांनी सांगितलं आहे. सुत्रांच्या माहितीनुसार सहा आमदारांमागे एक मंत्रीपद देण्याचा फॉर्म्युला निश्चित केला जाण्याची शक्यता आहे.
तर याच खातेवाटपा संदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी दिल्लीला गेले आहेत. पण आश्चर्याची बाब म्हणजे या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला न गेल्यामुळे पुन्हा उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.
तर दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत महायुतीतील घटक पक्षांच्या वाट्याला किती मंत्रिपदं येणार यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. तसंच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 14 डिसेंबरला होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.
महत्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीस बुधवारी पहिल्यांदाच दिल्लीला गेले आहेत. दरम्यान, दिल्लीला मुख्यमंत्र्यांसोबत गेलेल्या अजितदादांनी राष्ट्रवादीच्या वाट्याला कमी मंत्रीपदं आल्यास प्लॅन 'बी' तयार केल्याची माहिती आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे मागील सरकारमध्ये 9 मंत्री आणि विधानसभेचे उपाध्यक्षपद होते. यावेळी ते कायम रहावं अशी त्यांची मागणी आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या वाट्याला कमी मंत्रिपदं आल्यास केंद्रात एक मंत्रीपद आणि एखाद्या राज्याच्या राज्यपाल पदाची मागणी अजितदादांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.