
Mumbai News, 12 Dec : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर जे उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी रिंगणात उतरले होते. त्या उमेदवारांना निवडणूक खर्चाचा तपशील जाहीर करावा लागणार आहे. शिवाय विजयी उमेदवारांना देखील निवडणूक खर्चाचा तपशील निवडणूक आयोगापुढे सादर करावा लागणार आहे.
जर उमेदवारांनी आपल्या खर्चाचा तपशील दिला नाही तर त्यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या उमेदवारांना आता निवडणूक आयोगाने (Election Commission) स्मरण पत्र पाठवले आहे. त्यानुसार 23 डिसेंबरपर्यंत या उमेदवारांना निवडणूक आयोग कार्यालयात त्यांनी निवडणुकीच्या काळात केलेल्या खर्चाचा तपशील सादर करावा लागणार आहे.
जे उमेदवार या खर्चाचा तपशील सादर करणार नाहीत त्यांची उमेदवारी 3 वर्षांसाठी रद्द करण्याची तरदुत आयोगाच्या नियमावलीमध्ये असल्याची माहिती आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे आता आमदारांना आपला खर्च आयोगापुढे देणं बंधनकारक असणार आहे.
निवडणुकीच्या (Election) काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांना मोठ्या प्रमाणात प्रचार सभा, बॅनर, पत्रके, जाहीरनामे, झेंडे यासह कार्यकर्त्यांना खुष करण्यासाठी चहा, नाश्ता यासाठी खर्च केलेल्या पैशांचा तपशील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे देणे बंधनकारक आहे.
उमेदवाराने दिलेला खर्चा तपशील आणि वास्तवात केलेला खर्च यात काही तफावत आढळल्यास त्याबाबत नोटीस पाठवून खुलासा मागविण्यात येणार आहे. त्यामुळे आता विजयी झाले तरीही आमदारांना निवडणुकीत काळात केलेला बेसुमार खर्च अडचणीत आणू शकतो.
शिवाय कारण या काळातील खर्चाचा तपशील न दिल्यास उमेदवारांना स्मरणपत्र पाठवलं जाणार आहे. त्यानंतरही जर त्यांनी खर्चाचा तपशील दिला नाही तर केंद्रीय आयोगाकडून मोठी कारवाई केली जाऊ शकते. यामध्ये 3 वर्षांसाठी उमेदवारी रद्द केली जाऊ शकते तसंच पुढील निवडणूक लढविण्यासही बंदी घातली जाऊ शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.