Mumbai News: राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल. या बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार असून या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून विविध कारणांमुळे राज्य मंत्रिमंडळाची बैठक रद्द झाली होती. अखेर आज ही बैठक होणार आहे. (State Cabinet Meeting)
या बैठकीत भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेला गोळीबार, तसेच राज्यात सुरु असलेला मराठा आणि ओबीसी समाजाच्या प्रश्नावर चर्चा, तसेच मंत्री छगन भुजबळांनी आपण राजीनामा दिल्याचा गौप्यस्फोट केला होता, यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. याबरोबर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या प्रमुख मागण्या राज्य सरकारने मान्य केल्यानंतर मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाले आहेत. राज्य सरकार ओबीसी समाजावर अन्याय करत असल्याचा आरोप भुजबळ करत आहेत. या बरोबरच राज्यात विविध ओबीसी नेत्यांना घेऊन 'एल्गार मोर्चा'ही काढला जात आहे. ओबीसी समाजाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी भूमिका भुजबळांनी घेतली आहे. दरम्यान, या सर्व विषयांवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय चर्चा होते, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरमधील हिललाईन पोलिस ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या प्रकरणानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणात आमदार गायकवाड यांना बारा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
भाजपच्या आमदारांनी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर गोळीबार केला. यावरून सत्तेत असलेल्या दोन पक्षांच्या एकजुटीवर प्रश्न निर्माण झाला आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर गोळीबार करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होईल, असं आश्वासन दिलं आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः रुग्णालयात जाऊन महेश गायकवाड यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
सत्ताधारी आमदारांकडून कायदा मोडला जात असल्याचा आरोप करत विरोधक सत्ताधाऱ्यांना खडेबोल सुनावत आहेत. काही दिवसांपूर्वीच आमदार नितेश राणे यांनी देखील आम्हाला भीती नसल्याचं वक्तव्य केलं होतं. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं. यामुळे सत्ताधाऱ्यांना आता कायद्याचा धाक उरला आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या सर्व विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.या बैठकीत आमदारांना काही सूचना देण्यात येतात का ? हे पाहणे देखील औत्सुक्याचे असणार आहे.
(Edited By-Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.