Kunal Raut : मोठी बातमी ! युवक काँग्रेसचे कुणाल राऊत यांना अटक

Congress News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्राला कुणाल राऊत यांनी काळे फासल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Kunal Raut
Kunal RautSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: माजी मंत्री नितीन राऊत यांचे सुपुत्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना पोलिसांनी अटक केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्राला कुणाल राऊत यांनी काळे फासल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. (Youth Congress State President Kunal Raut)

नागपूरमध्ये लावण्यात आलेल्या मोदी सरकारच्या 'विकसित भारत' या जाहिरातीवर काळं फासणं कुणाल राऊत यांना चांगलंच भोवलं आहे. कुणाल राऊत यांच्यासह त्यांच्या काही सहकाऱ्यांनी शनिवारी जिल्हा परिषदेत 'मोदी की गॅरंटी' या आशयाच्या जाहिरातीच्या बॅनरवर काळं फासलं होतं. तसेच या फलकाचा वापर फक्त प्रचारासाठी होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Kunal Raut
Nitesh Rane News : 'मुंबईतील रोहिंगे, बांगलादेशींची अतिक्रमणं हटवा, अन्यथा..' ; नितशे राणेंचा इशारा

या प्रकरणात कुणाल राऊतांना पोलिसांनी कायदेशीर नोटीस बजावली होती. तसेच चौकशीसाठी त्यांच्या सहकाऱ्यांसह उपस्थित राहण्याची सूचना केली होती. मात्र, ते उपस्थित राहिले नाही. त्यानंतर पोलिसांनी कुणाल राऊतांना रविवारी कुही येथून ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर काँग्रेसकडून सरकारवर जोरदार टीका होत आहे.

दरम्यान,'मोदी की गॅरंटी' अशा आशयाच्या पोस्टरवरील मोदी हा शब्द खोडत तेथे भारत हा शब्द कुणाल राऊत यांनी लिहिला होता. तसेच मोदी सरकार सर्वसामान्य नागरिकांच्या पैशातून स्वतःची जाहिरात करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या कारवाईमुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

Kunal Raut
Prakash Ambedkar : मोठी बातमी ! अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांना 'एनडीए'मध्ये येण्याची केंद्रीय मंत्र्यांची ऑफर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com