Bachchu Kadu Latest News in Marathi sarkarnama
मुंबई

Bachchu Kadu : मी नाराज नाही ; मुख्यमंत्र्यांनी मला शब्द दिला आहे !

Bachchu Kadu : पुढील मंत्रिमंडळ विस्तारात तुमच्या नावाचा विचार केला जाईल, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला दिला आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मंत्रिमंडळ विस्ताराच्या (harashtra cabinet) पहिल्या टप्प्यात आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांना स्थान मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी नाराजीही व्यक्त केली होती. यावर बच्चू कडू यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

बच्चू कडू म्हणाले, "मी माझ्या काही कामानिमित्त बाहेर गेलो होतो. त्यामुळे मंत्रिमंडळ मंत्रिमंडळ विस्तारानंतर झालेल्या शपथविधीला मी गैरहजर होतो. व्यक्तिगत हितासाठी मी कधीही नाराज होणार नाही. पुढील मंत्रिमंडळ विस्तारात तुमच्या नावाचा विचार केला जाईल, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला दिला आहे. त्यामुळे नाराजीचा प्रश्न येत नाही," 15 सप्टेंबरपर्यंत मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार होईल, असे कडू म्हणाले.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे बंडखोरांवर सातत्याने टीका करत आहे. जे पक्षाशी एकनिष्ठ राहू शकले नाही ते जनतेशी काय निष्ठा ठेवणार. यावर पक्षनिष्ठा नाही तर जनतेशी निष्ठा महत्त्वाची असते. सामान्य नागरिक, जनतेवर निष्ठा असली पाहिजे, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला.

रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंग प्रकरणावर बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली. एखाद्या अधिकाऱ्याने नेत्यांचे फोन टॅप करणे, हा नालायकपणा असल्याचे कडू म्हणाले. कडू म्हणाले, "नेत्यांना तस्कर दाखवून त्यांचे फोन टॅप करण्यात आले. माझ्या पीएचा फोन टॅप करण्यात आला. हा नालायकपणा आहे. तसेच, मला कोणत्याही अधिकाऱ्याच्या, पक्षाच्या क्लिनचीटची गरज नाही. या प्रकरणात माझी चौकशी झालीच तर काय घडले ते सांगेन,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT