Maharashtra Waiting For Women CM Sarkarnama
मुंबई

Maharashtra CM: महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री लाभणार? काँग्रेस खासदाराचं मोठं विधान; 'ही' दोन नावंही सांगितली

Congress MP Varsha Gaikwad : महाराष्ट्राची मुख्यमंत्री महिला झाली तर आपल्याला अतिशय आनंद होईल.महाराष्ट्र पुरोगामी आणि प्रगत राज्य म्हणून ओळखले जाते. त्यातच महत्त्वाची बाब म्हणजे...

Deepak Kulkarni

Mumbai News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमधलं जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. पण तरीदेखील युती आणि आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा विषय सर्वाधिक चर्चेचा ठरत आहे. रोज नव्या नेत्याचं नाव मुख्यमंत्रिपदाच्यान शर्यतीत समोर येत आहे. यावरुन आरोप- प्रत्यारोप, दावे-प्रतिदावेही केले जात आहेत.

अशातच आता काँग्रेसच्या खासदारानं मोठं विधान केलं आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि रश्मी ठाकरे यांचं नाव दावेदार म्हणून समोर आलं आहे.

महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री कधी मिळणार याविषयी अधूनमधून जोरदार चर्चा झडत असतात.पण आता विधानसभेच्या तोंडावर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदासाठी महिला नेत्यांच्या दावेदारीचा मुद्दा चर्चेत येण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी मोठं विधान केलं आहे.

काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या,महाविकास आघाडीतील सर्व पक्षांकडे मुख्यमंत्रिपदासाठी महिलांचे चेहरे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये सुप्रिया सुळे तर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये रश्मी ठाकरे आहेत.आमच्या काँग्रेस पक्षातही महिला नेतेमंडळी आहेत. पण त्याबाबतचा निर्णय निवडून आलेली आमदार मंडळी घेत असतात.

खासदार गायकवाड म्हणाल्या,महाराष्ट्राची मुख्यमंत्री महिला झाली तर आपल्याला अतिशय आनंद होईल.महाराष्ट्र पुरोगामी आणि प्रगत राज्य म्हणून ओळखले जाते. त्यातच महत्त्वाची बाब म्हणजे आता आपण 50 टक्के आरक्षणही लागू केलं आहे.त्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे.

'आमच्या मनातले मुख्यमंत्री फडणवीसच...'

मंत्री आणि भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखल्या जात असलेल्या गिरीश महाजन यांनी नांदेडमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाबद्दल सूचक वक्तव्य केलं आहे. महाजन म्हणाले,मुख्यमंत्रिपदासाठी भाजपमध्ये एकमेव चेहरा आहे आणि तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. जर भाजपचा मुख्यमंत्री होत असेल तर देवेंद्रजीच होतील.पक्षश्रेष्ठीना सर्व अधिकार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

आगामी विधानसभा निवडणुकीबाबतही त्यांनी अतिशय महत्त्वाचं विधान केलं आहे.येत्या पंधरा ते वीस दिवसांत राज्यात आचारसंहिता लागू करण्यात येणार आहे.तसेच विधानसभा निवडणुकीत राज्यामध्ये महायुतीचाच विजय होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT