Ambadas Danve News : मागितले नंदनवन, हाती आले वाळवंट ; दानवेंनी चोळले शिरसाटांच्या जखमेवर मीठ

Leader of Thackeray group congratulated MLA Shirsat who became president of CIDCO : आमदार संजय शिरसाट, भरतशेठ गोगावले, सदा सरवणकर, आनंदराव आडसूळ, माजी खासदार हेमंत पाटील अशी अनेक नावे मंत्रीपद आणि राजकीय पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत होती.
Ambadas Danve
Ambadas DanveSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News : शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांची नुकतीच सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत झालेल्या बंडानंतर राज्यात सत्तांतर झाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा पहिल्याच मंत्रीमंडळात वर्णी लागेल, अशी अपेक्षा बाळगून असलेल्या संजय शिरसाट यांना शेवटी मंत्रीपद मिळालेच नाही. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाराजी नको म्हणून, मुख्यमंत्र्यांनी शिरसाट यांना सिडको महामंडळाचे अध्यक्षपद त्यांची बोळवण केली.

यावरून ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी आमदार संजय शिरसाट यांना टोला लगावत त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला. मागितले नंदनवन, हाती आले वाळवंट.. असो, वाळवंटात एखादं फुल उमलले तर त्यात आनंद मानावा.. त्याचा रंग आवडला नाही म्हणून मूड खराब करायला नको! सिडकोच्या अध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल अभिनंदन संजय शिरसाटजी!, अशा शब्दात अंबादास दानवे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला राहावा, आपले मुख्यमंत्री पद दुसऱ्या टर्ममध्येही कायम राहावे, यासाठी एकनाथ शिंदे यांनी पक्षातील नाराज आमदार, नेत्यांना खूष करण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यातील सत्तांतरापासून मंत्रीमंडळात वर्णी लागणार म्हणून कोट शिवून बसलेल्या अनेक आमदारांचे स्वप्न काही पुर्ण होऊ शकले नाही. अजित पवारांच्या राष्ट्रावादी काँग्रेसची सत्तेत झालेली एन्ट्री शिवसेनेतील मंत्री होण्यास इच्छुक असलेल्यांच्या मुळावरच उठली.

Ambadas Danve
Shivsena Leader Ambadas Danve News : अंबादास दानवे म्हणतात, भाजप शिंदेंना रडवेल

मंत्रीमंडळ विस्तार झाला पण तो अजित पवारांच्या आमदारांना मंत्री करण्यासाठी. शिवाय त्यांना महत्वाची खाती देण्यासाठी शिवसेनेच्या वाट्याची काही खातीही अजित पवारांनी पळवली. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात आधीच नाराजीचे वातावरण होते. (Sanjay Shirsat) आमदार संजय शिरसाट, भरतशेठ गोगावले, सदा सरवणकर, आनंदराव आडसूळ, माजी खासदार हेमंत पाटील अशी अनेक नावे मंत्रीपद आणि राजकीय पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत होती. यात सर्वात वरचा क्रमांक होता तो संजय शिरसाट यांचा.

मंत्रीमंडळ विस्तार होऊ न शकल्याने शिरसाट यांना अखेरच्या टप्प्यात म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या दोन महिने आधी सिडको महामंडळाचे अध्यक्षपद बहाल करण्यात आले. राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले हे पद असल्याने संजय शिरसाट यांची नाराजी काही प्रमाणात तरी दूर होईल, असा मुख्यमंत्र्यांचा अंदाज आहे.

Ambadas Danve
Sanjay Shirsat Politics: संजय शिरसाट का संतापले?, कोणाला म्हणाले बिनडोक!

संजय शिरसाट या अध्यक्ष पदामुळे किती खूष आहेत? हे सांगता येणार नाही. पण जे पद त्यांना मिळाले त्याचा आनंदही त्यांना मिळू द्यायचा नाही, असेच ठाकरे गटाने बहुदा ठरवले असावे. अंबादास दानवे यांनी शिरसाट यांना शुभेच्छा देतांना लगावलेला टोला हेच स्पष्ट करतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com