Vijay Wadettiwar, Ramesh Chennithala, Nana Patole Sarkarnama
मुंबई

Nana Patole VS Vijay Wadettiwar : काँग्रेस प्रभारींकडून नेत्यांना तंबी; म्हणाले, जरा जपून...

Maharashtra Congress : नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांच्यात चालचंय काय?

सरकारनामा ब्यूरो

जुई जाधव

Mumbai Political News :

काँग्रेसचे महाराष्ट्रचे प्रभारी रमेश चेन्नीथला (Ramesh Chennithala) काल मुंबईत होते. त्यावेळी पक्षातील अंतर्गत वाद उघड झाला. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यातला वाद उघड आहे. आता थेट प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी तंबी दिल्यामुळे वादाला पूर्णविराम मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.

काँग्रेसचे (Congress) नवे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याकडून प्रदेश कार्यकारिणीला तंबी देण्यात आली आहे. पक्षातील मतभेद माध्यमांसमोर उघड होऊ नये, याची काळजी घेण्याची सूचना त्यांनी केली आहे. नेत्यांमध्ये कितीही मतमतांतरे आणि वेगळ्या भूमिका असल्या तरीही सगळ्यांना सोबत घेऊन जायचे आहे, याची जाणीव प्रभारांनी करून दिली.

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या समन्वयकांची यादी तयार करण्यात आली होती. त्यावरूनही काँग्रेसमध्ये वाद दिसले. नाना पटोले यांना काही नावे मान्य नसल्याने त्यांनी थेट दिल्ली गाठून यादी रोखली. अनेक वेळा नेत्यांना दिल्लीमधून समज देण्यात आली आहे. अंतर्गत वादामुळे काँग्रेसमधील एकीबद्दल प्रश्न उपस्थित केले जातात. यामुळे पक्षाची बदनामी होते. या कारणांमुळे पक्षातील नेत्यांना तंबी देण्याची वेळ आली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील नाराजी वारंवार समोर येते. त्यांच्यातील वाद अनेकदा दिल्लीत पोहोचला होता. आता थेट प्रभारींकडून तंबी देण्यात आली आहे.

प्रभारी रमेश चेनीथाला यांनी काल (11 जानेवारी) मुंबईत बैठक घेतली. राहुल गांधी यांची 'न्याय यात्रा' लवकरात सुरू होणार आहे. या यात्रेसंदर्भात चर्चा करण्यासाठी ते मुंबईत आले होते. या बैठकीनंतर त्यांची पत्रकार परिषद देखील झाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या पत्रकार परिषदेमध्ये प्रभारी चेनीथाला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड, काँग्रेस नेते नसीम खान आणि माणिकराव ठाकरे मंचावर उपस्थित होते.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे उशिराने या पत्रकार परिषदेमध्ये आले. पत्रकार परिषदेच्या सभागृहात कार्यकर्त्यांची देखील गर्दी होती. दोघेही उशिरा आल्याने त्यांना बसण्यासाठी देखील स्टेजवर कोपऱ्यातली जागा मिळाली.

पत्रकार परिषदेत रमेश चेनीथाला यांना आणि नाना पटोले यांना प्रश्न विचारले. पण वडेट्टीवारांना कुणीही प्रश्न न विचारल्यामुळे आणि एकदम कोपऱ्यात स्थान दिल्यामुळे ते चिडून थेट पत्रकार परिषदेमधून निघून गेले. यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसमधील अंतर्गत वाद सामोर आला आहे. त्यामुळे आता हे वाद मिटवण्याचे आदेश थेट प्रभारींनी दिले आहेत.

(Edited by Avinash Chandane)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT