Vijay Wadettiwar : ...अन् विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार पत्रकारपरिषदेतून संतापून निघून गेले!

Maharashtra Congress : जाणून घ्या, मुंबईतील पत्रकारपरिषदेत नेमकं असं घडलं तरी काय?
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

जुई जाधव -

Congress Mumbai Press News : काँग्रेस पक्षात अंतर्गत वादविवाद सुरू आहेत, याची चर्चा सर्वत्र आहे. गुरुवारी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी महाराष्ट्रतील नेत्यांची 2024 च्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची काय रणनीती असेल, या पार्श्वभूमीवर बैठक घेतली. मात्र यामध्ये आता विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांची नाराजी समोर आली आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी सकाळी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक झाली, त्यानंतर राज्यातील जेष्ठ नेते आणि पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर पत्रकार परिषददेखील झाली. मात्र या पत्रकार परिषदेमधून विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी चिडून काढता पाय घेतल्याचे दिसून आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vijay Wadettiwar
Mla Disqualification Case Verdict : ठाकरे गटाला आता शेवटची आशा; सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावणार

राहुल गांधी यांची लवकरच देशभरात न्याययात्रा सुरू होणार आहे. या यात्रेसंदर्भात चर्चा करण्यासाठी आज चेन्नीथाला मुंबईत आले होते. ही बैठक झाल्यानंतर त्यांची पत्रकार परिषद देखील झाली. या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole), माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड, काँग्रेसनेते नसीम खान आणि माणिकराव ठाकरे मंचावर उपस्थित होते.

तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे उशीराने या पत्रकारपरिषदेमध्ये आले. पत्रकारपरिषदेच्या सभागृहात कार्यकर्त्यांची देखील गर्दी होती. दोघेही उशिरा आल्याने त्यांना बसण्यासाठीदेखील स्टेजवर कोपऱ्यातली जागा मिळाली. ज्यावेळी पत्रकारपरिषदेला सुरुवात झाली, तेव्हा पत्रकारांनी रमेश चेन्नीथला यांना आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना प्रश्न विचारले.

Vijay Wadettiwar
Rahul Narwekar : 'ठाकरे गटाला भरत गोगावलेंचा व्हीप लागू असणार' ; राहुल नार्वेकरांनी केलं स्पष्ट!

मात्र विरोधी पक्षेनेते विजय वडेट्टीवार यांना एकाने ही प्रश्न न विचारल्यामुळे आणि त्यांना जागाही एकदम कोपऱ्यात दिल्याने ते चिडून थेट पत्रकारपरिषदेमधून निघून गेले. यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसमधील अंतर्गत वाद सामोर आला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com