Maharashtra Dharm Podcast: आषाढी एकादशीनिमित्त पंढपूरमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या नव्या पॉडकास्टची घोषणा केली. महाराष्ट्र धर्म असं या पॉडकास्टचं नाव असणार आहे. यातून महाराष्ट्रात जन्मलेल्या विचारवंतांची माहिती देण्यात येणार आहे. पण यावरुन आता काँग्रेसनं भाजपला टार्गेट केलं आहे. महाराष्ट्र धर्म सांगताना मुख्यमंत्री समता सांगणार की समरसता अशा शब्दांत काँग्रेसचे नेते सचिव सावंत यांनी फडणवीसांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला डिवचलं आहे.
सचिन सावंत यांनी ट्विटद्वारे म्हटलं की, "रेशीम बागेतून ट्रेनिंग घेतलेले मुख्यमंत्री आता महाराष्ट्र धर्म पॉडकास्ट वरुन सा़ंगणार आहेत, आश्चर्य आहे. परंतू महाराष्ट्र धर्म हा केवळ सांगण्यासाठी नाही, जगण्यासाठी आहे. वारकरी संप्रदाय, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहित महाराष्ट्रातील तमाम जनतेने तो जगला. संघाला विशेषतः गोळवलकरांना तो कधी समजलाच नाही.
'प्रतिगामी हिंदुत्व' आणि 'पुरोगामी महाराष्ट्र' धर्म हे विरुद्धार्थी शब्द आहेत. त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना 'महाराष्ट्र धर्म' आठवला हे स्पष्ट आहे. असो! महाराष्ट्र धर्म प्रत्यक्षात जगणं सोडून द्या. महाराष्ट्र धर्म सांगताना मुख्यमंत्री 'समता' सांगणार की 'समरसता'? हे निदान स्पष्ट होणं आवश्यक आहे. महाराष्ट्र धर्माचा मूळ गाभा 'समता' आहे, 'समरसता' हा रेशीम बागेच्या शिकवणीतून आलेला शब्द आहे" अशा शब्दांत काँग्रेसनं मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका केली आहे.
दरम्यान, ठाकरे बंधुनी घेतलेल्या मराठी विजय मेळाव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात शासकीय पुजा केल्यानंतर 'महाराष्ट्र धर्म' या पॉडकास्टद्वारे महाराष्ट्रातील विचारवंतांची माहिती करुन देण्यात येणार असल्याची घोषणा केली.
संतसाहित्याचे अभ्यासक आणि लेखक सदानंद मोरे यांच्यासोबत केलेल्या या २४.४९ मिनिटांच्या पॉडकास्टमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, "महाराष्ट्र धर्म हा जीवन जगण्याचा एक नैतिक नियम आहे. जो आपल्याला तर्कशुद्धपणे विचार करण्यास, सेवेच्या भावनेने वागण्यास आणि शौर्यासह उभे राहण्यास सांगतो. संत ज्ञानेश्वरांच्या श्लोकांपासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीपर्यंत आणि महात्मा फुलेंच्या धाडसापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनापर्यंत, ही साखळी कधीही तुटली नाही आणि पुढे जात राहिली"
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.