Sharad Pawar, Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Maharashtra Election Results 2024 LIVE : निकालापूर्वी शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी उचलले मोठे पाऊल; पुन्हा दगाफटका होऊ नये, यासाठी...

Vidhan Sabha election 2024 vote Counting live Updates: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून त्यासाठी महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.दोन्ही पक्षाकडून येत्या दोन दिवसात उमेदवारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आले आहे.

Mangesh Mahale

Mumbai News: महाराष्ट्र विधानसभेच्या (Maharashtra Vidhan Sabha Election Nikal 2024) 288 जागांसाठीची मतमोजणी सुरु झाली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर होत असलेल्या या निवडणुकीकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. पक्षात याआधी पडलेली फूट लक्षात घेता आगामी काळात पुन्हा दगाफटका होऊ नये, यासाठी आधीच काळजी दोन्ही पक्षाकडून घेण्यात येत असल्याची सूत्रांची माहिती आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून त्यासाठी महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.दोन्ही पक्षाकडून येत्या दोन दिवसात उमेदवारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आले आहे. आज निकाल लागल्यानंतर निवडून आल्यानंतर आपण पक्षासोबतच राहू, असा उल्लेख प्रतिज्ञापत्रावर आहे. (Maharashtra Vidhan Sabha Election Nikal live update)

गेल्या विधानसभेच्या (2019)निवडणुकीनंतर गेले पाच वर्ष राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. पाच वर्षांत दोन सरकारं पाहायला मिळाली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस असे दोन बलाढ्य पक्ष फुटले. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे. (Maharashtra Assembly Election 2024 Result live Vote Counting)

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी की महायुती मैदान मारणार हे अवघ्या काही तासातच समजणार आहे. मतमोडणीस सुरवात झाली आहे. सत्ताधारी शिंदे-फडणवीस-पवार पुन्हा सत्तेत येणार का, महाविकास आघाडी त्यांच्याकडून सत्ता ताब्यात घेणार हे दुपारी समजेल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नसीम खान, नाना पटोले, राधाकृष्ण विखे पाटील, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, नवाब मलिक आणि झिशान सिद्दीकी या नेत्यांचं भवितव्य ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT