Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhav  sarkarnama
मुंबई

शिवसैनिकांचे रक्त सांडविण्याचा डाव, एकनाथराव परत या : भास्कर जाधवांचा घणाघात

सरकारनामा ब्युरो

मुंबई : विधानसभेत आज शिंदे-भाजप सरकारने बहुमताचा प्रस्ताव जिंकला. त्यानंतर सभागृहात शिवसेनेचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणीस यांच्यावर हल्लाबोल केला. (Maharashtra Floor Test result)

"आमचे मित्र एकनाथ शिंदे आणि आमचे दुसरे मित्र देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले. अशा पद्धतीने जेव्हा बदल घडतो तेव्हा सर्व मतभेद विसरून राग लोभ बाजूला ठेवून प्रथा परंपरा पार पाडवी लागते. देवेंद्र फडणवीस यांनी आता सांगितले आहे की दुसरा आवाज देखील ऐकला गेला पाहिजे. आज माझा आवाज दुसरा आहे.त्यामुळे मी जे बोलेने ते तुम्ही ऐकावे,"

"गेले आठ दिवस मी झोपलेलो नाही.मी कधी असा अस्वस्थ होत नाही. विचलित कशासाठी होतो हे माहित आहे. एकनाथ शिंदे सांगतात मी आजही शिवसैनिक आहे. एकनाथ शिंदे आपण मुख्यमंत्री झालात तुमच्यावर खूप जबाबदारी आहे. तुम्ही माझ्याशी कधी बोलत नव्हता. एकनाथ शिंदे मी तुमच्या ऑफिसमध्ये आलो, तेव्हा फक्त एकदाच भेट झाली. मी तुमच्या दालनात गेलो पण भेट झाली नाही.तुमच्या कोकणातील कामामुळे भारावून गेलो," असे जाधव म्हणाले.

"एकनाथ शिंदे तुम्हाला हे लढवत आहेत, रक्तपात होईल तो शिवसेनेचा होईल. शिवसेना संपविणे हा यांचा एककलमी कार्यक्रम आहे. त्यामुळे शिवसेना वाचवण्यासाठी शिंदे साहेब एक पाऊल मागे या," असे जाधव म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT