Floor Test LIVE : ज्यांनी टिंगल केली, त्यांचा मी बदला घेणार : फडणवीसांचा इशारा

Floor Test LIVE : ज्या सदस्यांनी प्रस्ताव बहुमतानं पारीत व्हावा यासाठी अप्रत्यक्षपणे सभागृहाच्या बाहेर राहून सहकार्य केलं, त्या अदृश्य 'हातांचे' मी आभार मानतो.
Devendra Fadanvis News, Floor Test news updates, Maharashtra Session news
Devendra Fadanvis News, Floor Test news updates, Maharashtra Session news Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : एकनाथ शिंदे सरकारने आज बहुमताचा (Maharashtra Floor Test) प्रस्ताव जिंकला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिंदे सरकारवर (Eknath Shinde) ज्या सदस्यांनी विश्वास टाकला त्यांचे आभार मानले.(Devendra Fadanvis News updates)

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी 'मी पुन्हा येईल'या आपल्या विधानाची आठवण सभागृहाला करुन दिली. यावेळी त्यांनी टोलेबाजी केली. फडणवीस म्हणाले,"ज्यांनी माझी टिंगल केली, अपमान केला, त्यांचा मी बदला घेणार. पण माझा बदला हा त्यांना माफ करण्याचा असेल,"

Devendra Fadanvis News, Floor Test news updates, Maharashtra Session news
assembly floor test : भाजपचा जल्लोष : शिंदे सरकारकडून बहुमताचा आकडा पार

फडणवीस म्हणाले, "ज्या सदस्यांनी प्रस्ताव बहुमतानं पारीत व्हावा यासाठी अप्रत्यक्षपणे सभागृहाच्या बाहेर राहून सहकार्य केलं, त्या अदृश्य 'हातांचे' मी आभार मानतो. मी म्हणालो होतो जेव्हा सरकार जाईल तेव्हा आम्ही पर्यायी सरकार देऊ. आमची खंत होती जनतेने आम्हाला बहुमत दिले तर काहींनी ते हिरावून नेले. आज जनतेने दिलेल्या बहुमताचा आम्ही सन्मान करतो. एकनाथ शिंदेंच्या पाठीशी मी पूर्णपणे उभा राहिन. त्यांच्यात आणि माझ्यात दुरावा दिसणार नाही. आमची मैत्री नेहमीच कायम राहील,"

शिंदे हे 24 बाय 7 काम करणारा नेता आहे. शिंदे हे प्रचंड माणुसकी असणारा, सामान्य जनतेसाठी जीवाची परवा न करता काम करणारा नेता असल्याचे म्हणत फडणवीस यांनी शिंदेंचं कौतुक केलं. एक यशस्वी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे काम करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Navi Mumbai crime
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com