मुंबई

Thackeray Government : मंत्रीपद गेलं तरीही १४ मंत्र्यांचा मुक्काम सरकारी बंगल्यातच!

मंत्री नसताना घुसखोरी करुन राहणं, मंत्रीमंडळात नसताना बंगले वापरणं हे अत्यंत चुकीचं आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्ष होऊन ठाकरे सरकार कोसळले. शिंदे सरकारच्या (eknath shinde) स्थापन झाल्यानंतरही ठाकरे सरकारमधील काही मंत्री अद्यापही सरकारी मंत्री ठाण मांडून बसले आहेत. आत्तापर्यंत ४० बंगल्यांपैकी १८ बंगले रिकामे झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुत्रांनी दिली आहे.

रिकाम्या न झालेल्या १४ बंगल्यांमध्ये शिंदे गटात सामील झालेल्या अनेक माजी मंत्र्यांचा समावेश असल्याचे कळते. शिंदे सरकार स्थापन होऊन महिन्याभरपेक्षा अधिक काळ लोटला आहे. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराचा अजूनही पत्ता नाही. असे असलं तरी काही नेत्यांकडून सरार्सपणे सरकारी बंगल्याचा वापर सुरू आहे.

उदय सामंत, संदीपान भुमरे आणि दादा भुसे या शिंदे गटातील नेत्यांच्या बंगल्यावर तर बैठका, पत्रकार परिषदा होत आहेत. यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाड यांच्या देखील समावेश होता. तर, मलबार हिलमधील काही बंगल्यांवर माजी तर अजूनही मंत्र्यांच्या नावाच्या पाट्या झळकत आहेत.

यावर कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले,"मंत्रीमंडळ बरखास्त झाल्यानंतर मंत्र्यांनी त्यांचे बंगले रिकामे करणं हा त्यांच्या नैतिकतेचा भाग आहे. पण सध्या बऱ्याच गोष्टी या नैतिकच्या आधारे होत नसल्याचे राजकीय क्षेत्रात दिसते,"

"मंत्रीमंडळाच्या खातेवाटपानुसार जो काही बंगला दिला असेल तिथं त्यांना राहण्याचा हक्क आहे. अन्यथा ते तिथे राहू शकत नाही. तो बंगला रिकामा करुन दिला पाहिजे, पण असे होताना दिसत नाही, सध्या शिंदे सरकारमध्ये दोनचं मंत्री आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारमधील माजी मंत्र्यांनी बंगले सोडलेले नाहीत, अशा प्रकारे अधिकार नसताना घुसखोरी करुन राहणं, मंत्रीमंडळात नसताना बंगले वापरणं हे अत्यंत चुकीचं आहे," असे सरोदे म्हणाले.

या मंत्र्यांनी अद्याप बंगले सोडले नाहीत

धनजंय मुंडे, छगन भुजबळ, जयंत पाटील, अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड, दादाजी भुसे, विजय वडेट्टीवार, उदय सामंत, हसन मुश्रीफ, गुलाबराव पाटील, संदिपानराव भुमरे, श्यामराव पाटील, नाना पटोले (माजी विधानसभा अध्यक्ष), सीताराम कुंटे (माजी अधिकारी)

  • मंत्र्यांसाठी मंत्रालय परिसरात, मलबार हिल आणि आमदार निवास येथील बंगल्यांमध्ये निवासाची व्यवस्था करण्यात येते.

  • आपल्या आवडीचा बंगला मिळावा यासाठी जवळपास सर्व मंत्र्यांकडून यासाठी जोरदार लॉबिंगदेखील करण्यात येते.

  • मंत्रीमंडळ बरखास्त झाल्यानंतर १५ दिवसांच्या कालावधीत हे बंगले रिक्त करावे लागतात.

  • ठाकरे सरकार पायउतार झाल्यास महिना उलटूनही अद्याप सार्वजनिक बांधकाम विभागाचे १४ बंगले रिकामे झालेले नाहीत.

  • रिकाम्या झालेल्या एका बंगल्याची दुरुस्ती सुरू आहे. आज आणखी काही माजी मंत्री बंगले सोडणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT