Bhaskar Jadhav : शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवांची राज्यपालांवर खालच्या भाषेत टीका ; म्हणाले..

bhagatsingh koshyari : कोश्यारींनी मराठी माणसांच्या विरोधात केलेल्या विधानावरुन लक्ष हटवण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक केल्याचा आरोपही जाधव यांनी यावेळी केली.
Bhaskar Jadhav
Bhaskar JadhavSarkarnama
Published on
Updated on

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणमधील शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठकीत शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांची जीभ घसरली. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर भास्कर जाधवांनी खालच्या भाषेत टीका केली.

"राज्यपाल म्हणजे घरगडी आहेत," अशा शब्दात भास्कर जाधवांनी भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला. देशात भाजपकडून दडपशाही सुरु असल्याची टीकाही भास्कर जाधवांनी केली.

राज्यपाल कोश्यारींनी मराठी माणसांच्या विरोधात केलेल्या विधानावरुन लक्ष हटवण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक केल्याचा आरोपही जाधव यांनी यावेळी केली.

भास्कर जाधव म्हणाले, "मावळते उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना संजय राऊत यांनी पत्र लिहिलं होतं. पाच ऑगस्टपर्यंत ईडीकडे त्यांनी वेळ मागितला होता. अधिवेशन संपल्यानंतर सात ऑगस्ट रोजी हजर राहण्याचंही सांगितलं होतं. पण राऊतांच्या पत्राला कोणतंही उत्तर न देता, लोकसभेचं अधिवेशन सुरू असतानाच ईडीने त्यांच्यावर कारवाई केली,"

Bhaskar Jadhav
Eknath Shinde : घाईघाईने मधुचंद्र केला, पण लग्न करायचे विसरले ; शिंदेंना शिवसेनेचा टोला

प्रादेशिक पक्ष संपवण्याची भाषा करताना भाजप एकनाथ शिंदे यांचा पक्ष कसा वाचवणार? असा प्रश्नही भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. 'मंत्रिमंडळाचा विस्तार होऊच नये. त्याची गरजच नाही. आता लोकांना लोकशाही काय आहे, ते समजले. बिनखात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस सर्व कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचेच राबवतायत. म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार न होता भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम राबवला जावा अशा माझ्या शुभेच्छा आहेत.' असा टोला भास्कर जाधवांनी लगावला.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आपल्या वक्तव्याने नेहमी चर्चेत राहतात. मुंबई संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे नुकतीच त्यांच्यावर महाराष्ट्राची माफी मागण्याची नामुष्की आली होती. त्यातच महाविकास आघाडीतील नेत्यांकडून राज्यपालांवर विविध विषयांवरून टीकेची झोड उठवण्यात येत आहे. काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केलेल्या जहरी टीकेनंतर शिवसेना आमदार भास्करराव जाधव यांनीही राज्यपालांवर खालच्या पातळीवरील टीका केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com