मुंबई : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) खासदार संभाजीराजे (mp sambhajiraje chhatrapati) यांनी आक्रमक पवित्रा घेत मुंबई येथील आझाद मैदानात आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे. आज (सोमवार) उपोषणाचा तिसरा दिवस आहे. ''मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यत मैदान सॊडणार नाही,'' असा इशारा संभाजीराजेंनी दिला आहे.
राज्य सरकारकडून 11 वाजता चर्चेसाठी बोलावण्यात आले आहे. समन्वयकांशी बोलून निर्णय घेणार, असे संभाजीराजे यांनी सांगितले. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या भेटीनंतर आंदोलन स्थगितीबाबत राज्य सरकारकडून हालचाली वाढल्या आहेत. आज सकाळी 11 वाजता बैठक होण्याची शक्यता आहे.
संभाजीराजे यांच्या तपासणीसाठी जेजे रुग्णालयातून ४ डॉक्टरांचे एक पथक दाखल झालं. त्यांनी संभाजीराजेंचे रक्तदाब आणि ब्लड सॅम्पल्स घेतले. या वैद्यकीय तपासणीत संभाजीराजे यांचे ब्लड प्रेशर आणि शुगर नॉर्मल असल्याचे आढळून आल्याची माहिती जेजे रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे. (Maratha Reservation News Updates)
संभाजीराजे यांच्या तपासणीसाठी जेजे रुग्णालयातून ४ डॉक्टरांचे एक पथक दाखल झालं. त्यांनी संभाजीराजेंचे रक्तदाब आणि ब्लड सॅम्पल्स घेतले. या वैद्यकीय तपासणीत संभाजीराजे यांचे ब्लड प्रेशर आणि शुगर लो असल्याचे आढळले असल्याची माहिती जेजे रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे.
''आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोवर उपोषणातून माघार घेणार नाही,'' असा निर्धार संभाजीराजेंनी केला आहे. दरम्यान जे.जे च्या डॉक्टरची टीम सलाईन लावण्यासाठी आली असता संभाजी राजे यांनी सलाईन लावण्यास नकार दिला.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी रविवारी संभाजीराजे यांची आझाद मैदानात भेट घेतली. यावेळी मराठा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक होत त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
खासदार अनिल देसाई यांनी या भेटीदरम्यान आम्ही सर्व आपल्यासोबत आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपल्या मागण्या मांडतो. आपल्या भावना लवकरात लवकर पोहोचवतो. मराठा समाजाला लवकरात लवकर न्याय मिळावा, ही आमचीही भूमिका आहे, असे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.