राऊतांची अवस्था भरकटलेल्या जहाजासारखी ; मोहोळांचे प्रत्युत्तर, 'हा' धंदा कुणाच्या आशीर्वादाने

राऊतजी, उत्तर द्याल का? डोक्यावर परिणाम झाला आणि वास्तवाचं भान हरवलं की असे टेबल न्यूजसारखे आरोप केले जातात.
Murlidhar Mohol,Sanjay Raut
Murlidhar Mohol,Sanjay Rautsarkarnama
Published on
Updated on

पुणे : शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी काल (शनिवारी) 'सामना'च्या अग्रलेखातून पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol)यांच्यावर टीकेचे बाण सोडले होते. त्याला मोहोळांनी आज टि्वट करुन प्रत्यु्त्तर दिले आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजप गैरवापर करीत असल्याचे संजय राऊत (Sanjay Raut)यांनी शनिवारी 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे. राऊतांनी भाजपला त्यांच्या नेत्यांनी केलेल्या भष्ट्राचाराची आठवण करुन दिली होती. भाजपचे नेते किरीट सोमय्या, मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), पिंपरी-चिंचवड महापालिका भाजप स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यावर राऊतांनी टीका केली आहे.

आपल्या टि्वटमध्ये मोहोळ म्हणतात, ''सर्वज्ञानी संजय राऊतजी, उत्तर द्याल का? डोक्यावर परिणाम झाला आणि वास्तवाचं भान हरवलं की असे टेबल न्यूजसारखे आरोप केले जातात. जम्बोचं प्रकरण अंगलट येतंय, याची जाणीव झाल्यावर हे असं दुसऱ्यावर शिंतोडे उडवणे सुरु आहे. खासदार राऊतांची अवस्था भरकटून बुडायला लागलेल्या जहाजासारखी आहे,''

''पुण्यातील जम्बो रुग्णालयाची उभारणीची चर्चा झाली, तेव्हाच मुंबईतील ठगांकडून यासाठीचे कंत्राटे मिळवण्यासाठीची दादागिरी सुरू केली होती. महापालिका प्रशासनाने आगामी काळातील या ठगांचे संभाव्य धोके ओळखले आणि प्रशासनाने हे रुग्णालय उभारण्याची जबाबदारी पीएमआरडीएवर दिली,'' असे मोहोळ यांनी म्हटलं आहे.

''पीएमआरडीए हे राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली येते. खासदार राऊत साहेब तुमच्या दारात नित्यनियमाने बसणाऱ्या त्या व्यक्तिंनी अटीशर्ती मॅनेज करून हे कंत्राट मिळवले आणि त्यांनी पुणेकरांचेच जीव घेतले. त्यानंतर पुणेकरांनी या तुमच्या बहाद्दरांना ब्लॅकलिस्ट करून पुण्यातून हाकलले आहे.पुणेकरांच्या जीवाशी खेळला गेलेला हा काळा धंदा कोणाच्या आशीर्वादाने झाला होता, याचा खुलासा केला तर बरं होईल,,'' असे मोहोळ यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

संजय राऊत 'सामना'च्या अग्रलेखात म्हणतात..

''पुण्याचे महापौर मोहोळ यांच्या भ्रष्टाचाराच्या सुरस कथा थक्क करणाऱ्या आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड मनपातील स्मार्ट सिटी घोटाळा ही जनतेच्या पैशांची लूट असून भाजपचेच लोक त्या लुटीचे भागीदार आहेत. नागपूर महापालिकाही या कामी मागे नाही. त्यामुळे भाजपच्या भ्रष्टाचारविरोधी युद्धात पुणे, पिंपरी-चिंचवड मनपातील घोटाळय़ांचा समावेश आहे काय?

''मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधवयांच्याकडे केंद्रीय तपास यंत्रणांचे पथक पोहोचले. त्यांना जो तपास करायचा तो करतील, पण भ्रष्टाचाराविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्यांना एक आठवण करून द्यायची आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील भाजप स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांना महापालिकेतच लाखो रुपयांची लाच स्वीकारताना अटक झाली व आठवडाभर जेल भोगून ते पुन्हा स्थायी समितीचा पुढला भ्रष्टाचार करण्यासाठी रुजू झाले. यावर भाजपवाले तोंड का उचकटत नाहीत?,''

Murlidhar Mohol,Sanjay Raut
मोठी बातमी : रशिया-युक्रेन युध्दात आता गुगल, टि्वटर, युट्युबची एंट्री

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com