Cm Uddhav Thackeray latest marathi News, Petrol Diesel latest Marathi News
Cm Uddhav Thackeray latest marathi News, Petrol Diesel latest Marathi News Sarkarnama
मुंबई

Breaking : अखेर ठाकरे सरकारनं करून दाखवलं! राज्यात पेट्रोल अन् डिझेलच्या दरात कपात

सरकारनामा ब्युरो

मुंबई : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात प्रतिलिटर अनुक्रमे 8 रुपये तर डिझेलवर 6 रुपये कपात करून शनिवारी सर्वसामान्यांना दिलासा दिला. त्यानंतर आता ठाकरे सरकारनेही महाराष्ट्रातील जनतेला दिलासा देत पेट्रोल व डिझेलचे दर कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. (Petrol Diesel price hike News)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी शनिवारी उत्पादन शुल्कात कपात करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे राज्यांवरही दर कमी करण्याचा दबाव वाढला होता. मागील काही दिवसांत सातत्याने इंधन दरवाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिक होरपळत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारवरही दबाव वाढला होता. (Maharashtra Government reduces price of Petrol and Diesel)

रविवारी राज्य सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देत पेट्रोलच्या मुल्यवर्धित करात (VAT) 2 रुपये 8 पैसे आणि डिझेलवरील करात 1 रुपये 44 पैसे कपात कऱण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यावर अडीच हजार कोटींचा बोजा पडणार आहे. मागील अनेक महिन्यांपासून दर कमी कऱण्याची मागणी विरोधी पक्षांसह नागरिकांकडूनही होत होती.

मोदी सरकारने गेल्या वर्षी 4 नोव्हेंबरला पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 5 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपये कपात केली. यानंतर पेट्रोलियम कंपन्यांकडूनही दरवाढ थांबवण्यात आली होती. नंतर ती पुन्हा सुरू झाली होती. त्यावेळी सर्व भाजपशासित राज्यांसह काही विरोधी पक्षांच्या राज्यांनीही दर कमी केले. पण महाराष्ट्र सरकारने कपात केली नव्हती. आता दुसऱ्यांदा केंदाने कपात केल्यानंतर राज्य सरकारनेही दर कपात केली.

दरम्यान, शनिवारी केंद्र सरकारने पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रतिलिटर ८ रुपये तर डिझेलवर ६ रुपयांनी कमी केली आहे. यामुळे पेट्रोल ९.५ रुपये तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त होणार आहे, असे सीतारामन यांनी सांगितले.

सुमारे साडेचार महिन्यांनंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात 22 मार्चपासून वाढ सुरू झाली होती. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 16 दिवसांत 14 वेळा वाढ करण्यात आली आहे. यामुळे या काळात पेट्रोल, डिझेलचे दर 10 रुपयांनी महागले होते. त्यानंतर 6 एप्रिलनंतर ही दरवाढ थांबली आहे. त्यानंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 105.41 रुपये असून, डिझेलचा दर 96.67 रुपये आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 120.51 रुपये आणि डिझेलचा दर 104.77 रुपये आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT