मोदी सरकारचा महागाईवर सर्जिकल स्ट्राईक; पेट्रोल 9.5 रुपये तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त

मोदी सरकारनं पुन्हा एकदा एकात फटक्यात पेट्रोल, डिझेल केलं स्वस्त
Narendra Modi
Narendra Modi Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : ऐन उन्हाळ्यात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीचा भडका उडाला आहे. या दरवाढीमुळे वाहनचालकांची होरपळ सुरू आहे. इंधन दरवाढ आणि महागाईवरून विरोधकांनी ओरड सुरू केली होती. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) यांच्या सरकारने आता महागाईवरच सर्जिकल स्ट्राईक केला आहे. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर ८ रुपये तर डिझेलवर ६ रुपये कपात करण्यात आली आहे. (Petrol Diesel price hike News)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही घोषणा केली आहे. आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रतिलिटर ८ रुपये तर डिझेलवर ६ रुपयांनी कमी करीत आहोत. यामुळे पेट्रोल ९.५ रुपये तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त होणार आहे, असे सीतारामन यांनी म्हटले आहे. दरम्यान, मोदींनी नुकताच देशातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी वाढत्या पेट्रोल दरांचा मुद्दा उपस्थित केला. मोदींनी काही राज्यांतील पेट्रोल दरांचे उदाहरण दिले होते. यात महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह इतर विरोधी पक्षांचे सरकार असलेल्या राज्यांतील पेट्रोल दरांची तुलना त्यांनी भाजपशासित राज्यांतील दरांशी केली होती. ते म्हणाले होते की, जागतिक पातळीवर युद्धसदृश स्थिती आहे. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत आहे. त्यामुळे सर्वांनीच संघराज्य रचना लक्षात घेऊन सहकार्य करायला हवे. राज्यांनीही पेट्रोल, डिझेलवरील मूल्यवर्धित करात कपात करावी.

Narendra Modi
देशपांडे अन् धुरी प्रकरण पोलिसांवरच शेकलं; न्यायालयानं जोरदार फटकारलं

देशात महागाईचा भडका उडाल्याने मागील वर्षी मोदी सरकारने (Modi Government) पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले. यानंतर पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका (Assembly Elections) असल्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीला ब्रेक लागला होता. या निवडणुका संपल्या असून, या पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा भडका उडण्याचा अंदाज आहे. मोदी सरकारने गेल्या वर्षी 4 नोव्हेंबरला पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) 5 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपये कपात केली. यानंतर पेट्रोलियम कंपन्यांकडूनही दरवाढ थांबवण्यात आली होती. नंतर ती पुन्हा सुरू झाली होती.

Narendra Modi
माजी मुख्यमंत्र्यांना दणका! गेल्याच वर्षी तुरुंगातून सुटल्यानंतर आता पुन्हा शिक्षा होणार

सुमारे साडेचार महिन्यांनंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात 22 मार्चपासून वाढ सुरू झाली होती. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 16 दिवसांत 14 वेळा वाढ करण्यात आली आहे. यामुळे या काळात पेट्रोल, डिझेलचे दर 10 रुपयांनी महागले होते. त्यानंतर 6 एप्रिलनंतर ही दरवाढ थांबली आहे. त्यानंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 105.41 रुपये असून, डिझेलचा दर 96.67 रुपये आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 120.51 रुपये आणि डिझेलचा दर 104.77 रुपये आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com