मुंबई : कोरोना (Corona) रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्यात लॉकडाऊन (Lockdown) केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मागील काही दिवसांपासून राज्यातील रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी राज्य सरकारने (State Government) तातडीने बैठक घेत यावर चर्चाचही केल्याचे समजते. मात्र, सरकारकडून लॉकडाऊन नव्हे तर कडक निर्बंधांचा निर्णय घेतल्याचे माहिती सुत्रांनी दिली.
राज्यात मंगळवारी 18 हजार 466 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 4 हजार 558 रुग्ण बरे होऊन घरी गेले. मागील काही दिवसांपासून दररोज रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत आहे. त्यातही मुंबईतील वाढ अत्यंत चिंताजनक आहे. यापार्श्वभूमीवर मुंबई, पुणे, ठाण्यासह अन्य काही शहरांमध्ये पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा बंद करून पुन्हा ऑनलाईन शाळा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने बुधवारी राज्य सरकारने तातडीने बैठक घेतल्याचे समजते. या बैठकीत राज्यात लॉकडाऊन न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, अनेक कडक निर्बंध लादले जाण्याचे संकेत मिळत आहेत. याबाबत लवकरच घोषणा होऊ शकते, असं समजते. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope), जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आदी मंत्री या बैठकीला उपस्थित होते.
दरम्यान, अजित पवार यांनी मंगळवारी पुण्यात झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील आठवीपर्यंतच्या शाळा आजपासून बंद करण्याचा निर्णय घेतला. आठवीपर्यंतच्या शाळा आपापल्या पातळीवर ‘ऑनलाइन’ पद्धतीने चालू राहतील. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात लस द्यायची असल्याने या शाळा सुरू राहतील, असे पवार यांनी सांगितले.
मास्क नसेल तर पाचशे रूपये दंड व रस्त्यावर थुंकला तर एक हजार रूपये दंड करण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले. दोन लस घेतल्या असतील तरच यापुढे हॉटेल, सिनेमा थिएटर, मॉल अशा सार्वजनिक ठिकाणी प्रवेश देण्यात येणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. मास्क वापरताना सर्जिकल मास्क किंवा ‘एन-९५’ मॉस्क वापरण्याचे आवाहन पवार यांनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.