Maharashtra Politics news  Sarkarnama
मुंबई

Maharashtra Politics: महायुतीत खलबतं; मंत्रिपदाची आस लावून बसलेल्या नेत्यांची महामंडाळावर वर्णी ?

Mangesh Mahale

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी चर्चा होती, पण आता विधानसभा तोंडावर आली आहे, तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. अद्यापही मंत्रिपदाची माळ गळ्यात न पडलेल्या, मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांची महामंडळावर वर्णी लागणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी महायुतीतील वरिष्ठ नेते यादी तयार करीत आहेत. येत्या काही दिवसात ही नावे जाहीर होतील.

विधानसभा निवडणुकीनंतर कुठलेही सरकार आले तरी आता नियुक्त केलेले नेतेचं महामंडळावर राहतील, अशीही माहिती आहे. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची निवडही प्रलंबित आहे. त्याचाही निर्णय होणार असल्याची माहिती आहे. ज्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाहीत त्यांना महामंडळ देऊन त्यांची नाराजी दूर केली केली जाणार आहे.

महायुतीमधील तीनही पक्षांकडून याबाबतच्या हालचाली सुरु आहेत. महामंडळावर नियुक्ती करण्यासाठी नेत्यांच्या नावांची यादी बनवण्याचे काम सुरु आहे. येत्या १७ ऑगस्टपर्यंत ही नावे निश्चित होतील, अशी माहिती आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली आमदार प्रसाद लाड हे ही यादी करीत आहेत. त्यानंतर महायुतीच्या बैठकीत नावावर शिक्कामोर्तब होईल.

जून 2022 मध्ये शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. तेव्हापासून महामंडळे, विविध समित्यांवरील नेमणुका झालेल्या नाहीत. मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले राम शिंदे, देवयानी फरांदे, संजय कुटे, आशिष शेलार, भरत गोगावले, संजय शिरसाठ, बच्चू कडू, माणिकराव कोकाटे यांची महामंडळावर वर्णी लागेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

रिक्त असलेले महामंडळ

  • चर्मोद्योग विकास महामंडळ

  • महाराष्ट्र औद्योगीकरण विकास महामंडळ

  • महाराष्ट्र कामगार कल्याण महामंडळ

  • महारष्ट्र राज्य वखार महामंडळ

  • महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळ

  • महिला अर्थिक विकास महामंडळ

  • सिडको

  • महात्मा फुले महामंडळ

  • आण्णाभाऊ साठे महामंडळ

  • ⁠म्हाडा

  • महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ

  • महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ

  • महराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT