Maharashtra Government Announces Scholarship Benefits for 124 New AEDP Courses. (AI Image) Sarkarnama
मुंबई

Student Scholarship news : विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, आता 124 नवीन अभ्यासक्रमांसाठीही शिष्यवृत्ती अन् निर्वाह भत्ता योजना लागू

Scholarship Scheme, 124 New Courses, Higher Education, Technical Education, AEDP Courses : दोन्ही योजनांमध्ये AEDP अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांचा समावेश करण्याचा निर्णय सचिवस्तरीय समितीने मार्च २०२६ मध्ये घेतला होता. त्याला आता राज्य सरकारनेही मंजुरी दिली आहे.

Rajanand More

Maharashtra education News : राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना व डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेमध्ये आणखी १२४ नवीन अभ्यासक्रमांचा समावेश केला आहे. त्याची अंमलबजावणी २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासूनच होणार असल्याने अनेक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून मंगळवारी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये Apprenticeship Embedded Degree Programme (AEDP) अंतर्गत नवे अभ्यासक्रम राबविण्याबाबत मार्च २०२५ मध्ये मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व पात्र ठरणाऱ्या संलग्न, महाविद्यालयांमध्ये हे अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६ पासून सुरू करण्यात आले आहेत.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना व डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना या दोन्ही योजनांमध्ये AEDP अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांचा समावेश करण्याचा निर्णय सचिवस्तरीय समितीने मार्च २०२६ मध्ये घेतला होता. त्याला आता राज्य सरकारनेही मंजुरी दिली आहे.

विकसित महाराष्ट्र २०४७ च्या Action Plan मध्ये AEDP कार्यक्रमाचे बळकटीकरण करण्याचा समावेश आहे. त्यानुषंगाने उच्च व तंत्र शिक्षण विभागातील AEDP अभ्यासक्रमांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना व डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना लागू करण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे.

योजनांबाबतच्या प्रचलित शासन निर्णयांमध्ये विहित केलेल्या पात्रता अटी, उत्पन्न मर्यादा, जात प्रवर्गनिहाय निकष व अन्य शर्तींच्या अधीन राहून २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना महा-डीबीटी संकेतस्थळावर विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज सादर करावे लागतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT