Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

Raj Thackeray News : काही झाले तरी ठाकरे बंधू एकत्र येणारच! राऊतांच्या फोननंतर राज ठाकरेंकडून शिक्कामोर्तब

Maharashtra Government’s Decision to Revoke Hindi GRs : राज्य सरकारने हिंदी सक्तीचे दोन्ही जीआर रद्द केल्यानंतर ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द करण्यात आला आहे. मात्र, 5 तारखेला विजयी मेळावा होणार असल्याचे राज ठाकरेंनी आज स्पष्ट केले.

Rajanand More

Raj Thackeray’s Victory Rally Announcement : हिंदी सक्तीच्या निर्णयाला विरोध झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने रविवारी संबंधित दोन्ही जीआर रद्द केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सक्तीविरोधात 5 जुलैला मोर्चाची घोषणा केली होती. त्याआधीच सरकारने जीआर रद्द केल्याने खासदार संजय राऊत यांनी मोर्चा रद्द झाल्याची घोषणा केली. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही, अशी चर्चा होती. त्यावर राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.

राज ठाकरेंनी सोमवारी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, सरकारने जीआर रद्द केल्यानंतर काल मला संजय राऊतांचा फोन आला होता. त्यांनी सांगितले की, मोर्चा तर रद्द करावा लागेल. विजयी मोर्चा घेऊयात. त्यावर 5 तारखेला घेता येईल, पण ठिकाण ठरवू नका, असे त्यांना सांगितले. त्याप्रमाणे अजून काही ठिकाण ठरलेले नाही. मी माझ्या सहकाऱ्यांशी बोलेन, असे राज ठाकरेंनी स्पष्ट केले. राऊतांच्या फोननंतर विजयी मेळावा ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत उद्धव ठाकरेंनी रविवारीच विजयी सभेबाबत संकेत दिले होते. त्यामुळे जीआर रद्द झाले तरी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार हे स्पष्ट झाले आहे.

मेळावा झाला तरी त्याला पक्षीय लेबल लावले जाऊ नये, असेही राज ठाकरे म्हणाले. हा विजय मराठी माणसांचा आहे, त्यादृष्टीने त्याकडे पाहिले पाहिजे. युती, आघाडीचा विचार आता करू नये. याकडे एक संकट म्हणून पाहावे, असे राज ठाकरेंनी सांगितले. महाराष्ट्र सरकारने काल हिंदी सक्तीचे दोन्ही जीआर रद्द केले. त्यांना ते रद्द करायला भाग पाडले. सगळीकडून रेटा आल्याने सर्व मराठी बांधवांचे मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो, असे ठाकरे म्हणाले.

सरकार परत असल्या भानगडीत जाणार नाही, अशी मी आशा बाळगतो. या गोष्टी करायची गरजच नव्हती. त्यादिवशी दादा भूसे माझ्याकडे आले होते. त्यांनी आमचे ऐकून घ्या, असे म्हणाले होते. या विषयात कोणतीही तडजोड होणार नाही, हे मी त्यांना सांगितले होते. त्यांनी प्रयत्न करून पाहिला आणि अंगाशी आला, असे राज ठाकरेंनी सांगितले.

समिती नेमली तरी परत ही गोष्ट होणार नाही, हे सरकारने लक्षात ठेवावे. आम्ही मान्य करणार नाही. मुळात हिंदी आणण्याचा ह्यांचा प्रयत्न का आहे, हे मला कळलेले नाही. हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. एका प्रांताची भाषा आहे. उत्तर भारतातील अनेक लोक नोकरीसाठी महाराष्ट्रात येतात. उलट त्यांना मराठी शिकवायला हवा, असेही राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्राचे सर्व बाजूने लचके तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे सर्व राजकीय नेत्यांनी जागरूक राहणे गरजेचे आहे. कुणीही असले तरी आम्ही मराठीशी तडजोड करणार नाही, असे राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले. माझ्याकडे अजून त्याबाबत सविस्तर माहिती नाही. उद्धव ठाकरेंची निर्णय असले तरी विरोध करेन, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT