Monsoon Session 2025 : राज्य विधीमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशन सुरु झाले. मात्र, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी शिवसेनेच्या आमदार आणि मंत्र्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. या आंदोलनात उद्धव ठाकरेंच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. उद्धव ठाकरेंच्या हातात चाकू असल्याचे फलक देखील या आंदोलनात झळकवण्यात आले.
शिवसेनेच्या वर्धापन दिना दिवशी कम ऑन कील मी, असे वक्तव्य ठाकरे यांनी केले होते. त्यावरून ठाकरे यांची खिल्ली उठवणारे पोस्टर शिवसेना आमदार आणि मंत्र्यांच्या हातात होते. राज्यात त्रिभाषा सुत्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच स्वीकारले होते. त्यावर देखील त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
आंदोलन करणाऱ्यांनी माध्यमांशाी बोलण्यास नकार दिला. मात्र, त्रिभाषा सुत्र उद्धव ठाकरे यांनी स्वीकारले होते. त्यामुळे हिंदीच्या अंमलबजावणीला तेच जबाबदार असल्याचा आरोप आमदार करत होते. दरम्यान, सरकारने हिंदी अंमलबजावणीचा जीआर रद्द केल्याने विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षांनी आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान, सभागृहात शोकप्रस्ताव परित होताच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उद्या मंगळवारपर्यंत सभागृहाचे कामकाज स्थगित केले.
विधान भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोधकांकडून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विरोधकांनी डोक्यावर 'मी मराठी' लिहिलेली टोपी घासून हिंदी अंमलबजावणीचा जीआर रद्द झाल्याचा आनंदोत्सव साजरा केला.
दरम्यान, अधिवेशनासाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे दाखल होताच विरोधकांनी त्यांनी 'मी मराठी' असे लिहिलेली टोपी घातली.मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील आनंदाने त्या टोपीचा स्वीकार केल्याचे दिसले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.