Devendra Fadnavis, sandeep deshpande Sarkarnama
मुंबई

Maharashtra politics : आदित्य अन् अमित ठाकरेंची शाळा काढणाऱ्या CM फडणवीसांना संदीप देशपांडेंनी सुनावलं...

MNS On Devendra Fadnavis : महायुती सरकारच्या पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयाला राज आणि उद्धव ठाकरेंनी कडाडून विरोध केला. राज्यभरातील राजकीय आणि सामाजिक रोष पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी भाषा सक्तीचा जीआर रद्द केल्याची घोषणा केली.

Jagdish Patil

Mumbai News, 02 Jul : महायुती सरकारच्या पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयाला राज आणि उद्धव ठाकरेंनी कडाडून विरोध केला. राज्यभरातील राजकीय आणि सामाजिक रोष पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी भाषा सक्तीचा जीआर रद्द केल्याची घोषणा केली.

फडणवीसांनी जीआर रद्द करताच मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, ठाकरे बंधूंनी विजयोत्सव साजरा करण्याचे आपल्या कार्यकर्त्यांना आदेश दिल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरेंच्या मुलांची थेट शाळाच काढली.

आपल्या मुलांना बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचं आणि भारतीय भाषांना विरोध करायचा, असं म्हणत त्यांनी दोन्ही ठाकरेंवर निशाणा साधला. फडणवीसांच्या याच वक्तव्यावरून मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं आहे.

संदीप देशपांडे म्हणाले, बॉम्बे स्कॉटिश महाराष्ट्रातील आणि राज्य सरकारने परवानगी दिलेलीच शाळा आहे ना? बॉम्बे स्कॉटिश शाळा वाईट आहे, असं फडणवीसांना म्हणायचं आहे का? त्या शाळेत शिकण्यात गैर काय? असा सवाल त्यांनी फडणवीसांना केला.

शिवाय तुम्ही मुख्यमंत्री म्हणून काय करताय, भाजपचे नेते कोणत्या शाळेत शिकले हे मी सांगू का असं म्हणत महाराष्ट्रमधला मराठी माणूस एकत्र आल्यामुळे शासन हादरलंय, अशा शब्दात त्यांनी फडणवीसांच्या टिकेला प्रत्युत्तर दिलं.

मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?

ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आणि मनसेनेते अमित ठाकरे यांच्या बॉम्बे स्कॉटिश स्कुलचा उल्लेख करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आम्हाला भारतीय भाषांचा अभिमान आहे. बॉम्बे स्कॉटिश स्कुलमध्ये शिकायचं इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि भारतीय भाषांना विरोध करायचा. सध्या फेक नरेटीव्ह सेट करायची फॅक्टरी सुरू आहे. मात्र कुणाच्याही दबावाला बळी न पडता सरकारी समिती जो निर्णय देईल तो घेणारच."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT