MNS Shiv Sena UBT Alliance : ठाकरे बंधुंच्या युतीबाबत मोठी अपडेट! पुणे, पिंपरी-चिंचवडच्या निर्णयामुळे गोंधळ वाढणार? मनसेचा सर्व्हेक्षणावरच भरोसा

MNS Politics Local Body Elections : मुंबई महापालिकेच्या बाबतीत ही युती काही प्रमाणात फायदेशीर ठरू शकते, असे चित्र असले तरी राज्यातील इतर महापालिकांमध्ये याचा किती फायदा होईल, याबाबत मनसे साशंक आहे.
uddhav thackeray Raj  thackeray
uddhav thackeray Raj thackeraySarkarnama
Published on
Updated on

MNS News : राज्यातील शालेय शिक्षणात हिंदी भाषेच्या सक्तीविरोधातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधू आणि त्यांच्या पक्षांमध्ये सूर जुळल्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती होण्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' पक्षासोबत युती केल्यास मनसेला किती फायदा होईल, याचे सर्व्हेक्षण केल्यानंतरच मनसे अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? या प्रश्नामुळे राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. दोन्ही पक्ष आपापली अस्तित्वाची लढाई लढत असताना, मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढवली गेल्यास मराठी मतांचे विभाजन टळून दोघांनाही फायदा होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई महापालिकेच्या बाबतीत ही युती काही प्रमाणात फायदेशीर ठरू शकते, असे चित्र असले तरी राज्यातील इतर महापालिकांमध्ये याचा किती फायदा होईल, याबाबत मनसेचे स्थानिक पदाधिकारी साशंकता व्यक्त करत आहेत. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडसारख्या महत्त्वाच्या शहरांतील निवडणुकीत कोणत्या पक्षासोबत युती करावी, यावर मनसेने कोणताही अंतिम निर्णय न घेता सर्व पर्यायांचा अभ्यास सुरू केला आहे.

uddhav thackeray Raj  thackeray
Nitin Gadkari Angry : मंत्र्याने अधिकाऱ्याला चोपले, नितीन गडकरी प्रचंड संतापले; थेट मुख्यमंत्र्यांना फोन करून म्हणाले, 'दोषींवर...'

'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 'शिवसेना', भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यापैकी कोणासोबत युती केली, तर पक्षाला किती राजकीय फायदा होईल, याचा सखोल अभ्यास मनसे करत आहे.

मुंबईतील मराठी मतांचे विभाजन टाळण्यासाठी मनसे-उद्धव ठाकरे युती केल्यास फायदा होऊ शकतो. मात्र, हिंदी सक्तीविरोधातील आक्रमक भूमिका घेतल्यामुळे हिंदी भाषिक मतदार नाराज होण्याची शक्यता असून, याबाबत काही पदाधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

त्यामुळे युतीच्या फायद्या-तोट्यांचा वस्तुनिष्ठ अंदाज घेऊनच निर्णय घेतला जाईल. यासाठी लवकरच मनसेकडून स्वतंत्र सर्वेक्षण केले जाणार आहे आणि त्याचा अहवाल पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. त्यानंतरच युतीबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल, असे मनसे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

uddhav thackeray Raj  thackeray
Hindi Imposition Politics : उद्धव ठाकरेंनीच हिंदी सक्ती स्वीकारली? 'त्या' दाव्याची पुराव्यानिशी पोलखोल! जीआरच वाचून दाखवला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com