Mumbai News : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्यातील खेळाडूंसाठी धडकेबाज निर्णय जाहीर केले आहेत. क्रीडा विभागाला कार्यक्रम खर्चासाठी ५६७ कोटी रुपये नियत्वे प्रस्तावित केला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळविणाऱ्या राज्यातील खेळाडूंना मिळणाऱ्या पारितोषिकाच्या रकमेत तब्बल दहापट वाढ करण्यात आली आहे. त्यातून राज्यातील क्रीडा क्षेत्राला चालना मिळून खेळाडूंना सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
अर्थमंत्री अजित पवार (Finance Minister Ajit Pawar) यांनी आज दुपारी विधान सभेत राज्याचा २०२४-२५ या वर्षीचा अंतरिम अर्थसंकल्प (Maharashtra Interim Budget 2024) सादर केला. या अर्थसंकल्प सादर करताना विविध घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यात विविध क्रीडा प्रकारात नवनवीन खेळाडू तयार व्हावेत आणि त्यांना सर्वोत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा मिळावी, यासाठी खेळाडू मिळणाऱ्या बक्षीसाच्या रक्कमे घसघशीत दहा टक्के वाढ करण्याची घोषणा पवार यांनी केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राज्यभरातील खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील कामगिरी उंचावण्यासाठी ‘मिशन लक्षवेध’ योजना राबविण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून राज्य स्तरावर उच्च कामगिरी केंद्र, विभागीय पातळीवर क्रीडा उत्कृष्टता केंद्र आणि जिल्हा स्तरावर प्रतिभा विकास केंद्र अशी प्रशिक्षणाची त्रिस्तरीय यंत्रणा उभारण्यात येणार आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेत ( Asian Games) पदक मिळविणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूंच्या परितोषिकाच्या रकमेत दहापट वाढ करण्याची घोषणा अजित पवार यांनी केली. त्यानुसार सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंना एक कोटी रुपयांचे बक्षीस यापुढे देण्यात येणार आहे. रौप्य पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना आता ७५ लाख रुपये, तर कांस्य पदक विजेत्या खेळाडूंना ५० लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
नागपूरला आता राज्य क्रीडा संकुल होणार
नागपूरच्या विभागीय क्रीडा संकुलात आता आंतरराष्ट्रीय क्रीडा व अनुषंगिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याशिवाय या विभागीय क्रीडा संकुलाला आता राज्य क्रीडा संकुलाचा दर्जा देण्याचा निर्णयही अजित पवार यांनी जाहीर केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.