Marathwada NCP : नेतृत्वगुणाचे तोंडभरून कौतुक करत अजितदादांनी मोदींना केले प्रदेश उपाध्यक्ष!

Ajit Pawar praised Rajkishor Modi : तब्बल १५ वर्षे नगराध्यक्ष राहिलेल्या राजकिशोर मोदी यांना दिवंगत विलासराव देशमुख यांच्या काळात दहा वर्षे कापूस पणन महासंघाचे उपाध्यक्षपद, वैधानिक विकास महामंडळाचे उपाध्यक्षदावरही संधी मिळाली.
Rajkishor Modi-Ajit Pawar
Rajkishor Modi-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या नेतृत्वगुणांचे तोंडभरुन कौतुक केले. त्यानंतर दोनच दिवसांत त्यांच्यावर पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. मागील ३८ वर्षांपासून राजकारण व समाजकारणात असलेले राजकिशोर मोदी दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते.

मराठवाड्याचे पुणे अशी ओळख असलेल्या आणि सुसंस्कृत लोकांचे शहर असलेल्या अंबाजोगाईवर अल्पसंख्यांक समाजातील राजकिशोर मोदी (Rajkishor Modi ) यांनी आपले राजकीय कौशल्य आणि विकास कामांच्या बळावर २५ वर्षे काँग्रेसची सत्ता टिकवली. बीड (Beed) जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची वाताहत असतानाही त्यांनी मात्र पक्षाचा झेंडा कायम फडकवत ठेवला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rajkishor Modi-Ajit Pawar
Maharashtra Interim budget 2024 : बाळासाहेब थोरातांनी पहिल्या तासातच सरकारला धारेवर धरले, ‘आम्ही रात्रभर जागचं राहावं का?’

तब्बल १५ वर्षे नगराध्यक्ष राहिलेल्या राजकिशोर मोदी यांना दिवंगत विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांच्या काळात दहा वर्षे कापूस पणन महासंघाचे उपाध्यक्षपद, वैधानिक विकास महामंडळाचे उपाध्यक्षदावरही संधी मिळाली. त्यांनी काँग्रेस युवक आघाडी आणि राज्याच्या मुख्य संघटनेतही काम केले. चार वर्षे ते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते.

दरम्यान, दोन वर्षांपूर्वी त्यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला. राजकिशोर मोदी अध्यक्ष असलेल्या अंबाजोगाई पीपल्स को-ऑपरेटीव्ह बँकेच्या छत्रपती संभाजीनगर शाखेचे उद्‌घाटन तीन दिवसांपूर्वी (शुक्रवारी) राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते झाले.

या उद॒घाटन सोहळ्यात अजित पवारांनी दिवंगत विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वगुणांचे कौतुक करताना त्यांनी राजकीशोर मोदींना कसे बळ दिले आणि मोदींमध्ये नेतृत्व गुण तसेच संघटन कौशल्याची असलेली जाण याचे कौतुक केले.

Rajkishor Modi-Ajit Pawar
Maharashtra Budget 2024: सत्ताधाऱ्यांनी केवळ स्वत:ची पाठ थोपटून घेतली : उद्धव ठाकरे

दिवंगत विलासराव देशमुख यांच्यानंतर राष्ट्रवादीत आलेल्या मोदींसारख्या कार्यकर्त्यांची आपल्याला पारख असल्याचे अजित पवार म्हणाले होते. त्यानंतर दोनच दिवसांनी सोमवारी राजकिशोर मोदी यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष पदावर नेमणूक करण्यात आली आहे.

Edited By : Vijay Dudhale

Rajkishor Modi-Ajit Pawar
Eknath Shinde : "...म्हणून मुख्यमंत्री म्हणाले, मी कार्यक्रम करतो", शिंदे गटातील मंत्र्यांचं स्पष्टीकरण

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com