शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नुकतीच दिल्ली वारी झाली. त्यानंतर महाविकास आघाडीकडून त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आगामी विधानसभा निवडणुकीत ते आघाडीचे प्रमुख नेते असतील. काँग्रेस हायकमांडने राज्याच्या काँग्रेस नेत्यांना ही माहिती दिली आहे. साम टीव्हीने याबाबतचे वृत्त दिले आहे.
उद्धव ठाकरे यांचे काम आणि नेतृत्वामुळे त्यांनी ही जबाबदारी दिल्याची माहिती आहे. आगामी विधानसभा निवडुकीसाठी आघाडीचा प्रमुख चेहरा असावा, अशी चर्चा होती. पण तो मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नसावा, असे आघाडीतील नेत्यांचे मत आहे. ठाकरे यांचे नेतृत्व आणि लोकप्रियता पाहता विधानसभा निवडणूक प्रचारात ते प्रमुख नेते, असतील यावर काँग्रेस नेत्यांमध्ये एकमत झाल्याची माहिती आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीला कसे सामोरे जावे, याबाबत विचारविनिमय करण्यासाठी येत्या दोन तीन दिवसात महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक आहे, असी माहिती काँग्रेसचे नेते, विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. बैठकीत जागा वाटपाचे सुत्र ठरणार असल्याचे समजते. इंडिया आघाडीत असणाऱ्या इतर छोट्या पक्षांना देखील महाविकास आघाडीत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना हायकमांडने काँग्रेस नेत्यांना दिल्या आहेत.
मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांचे नाव खासदार संजय राऊत यांनी काही दिवसापूर्वी पुढे रेटले होते. त्यानंतरआघाडी बिघाडीत होण्याची शंका व्यक्त केली जात होती. उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर राऊतांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून ठाकरे यांचे नाव पुढे करणे टाळले आहे. आघाडीतील तीनही घटक पक्षाकडून मुख्यमंत्रीपदासाठी आपल्या नेत्यांचे नाव पुढे येत आहे. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
"ज्याचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री," असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतेच केले आहे. चव्हाणांच्या विधानाचा धागा पकडून शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदाबाबत महत्वाचे विधान केले आहे."मुख्यमंत्रिपदाबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडलेली भूमिका दुर्लक्ष करण्याजोगी नाही," असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.