Rahul Narvekar Latest News
Rahul Narvekar Latest News sarkarnama
मुंबई

Rahul Narvekar Returned To Mumbai: मुंबईत पाय ठेवताच राहुल नार्वेकरांनी वाढवले ठाकरेंचे टेन्शन; भरत गोगावलेंच्या नियुक्तीवर म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मागील आठवड्यात निकाल दिला. या घटनापीठाने निकाल देताना राज्यपालांच्या भूमिकेवर कठोर ताशेरे ओढले होते. तसचे १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर लंडन दौऱ्यावर होते. ते आज मुंबईत दाखल झाले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

एकनाथ शिंदे गटाने प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती केली होती. सर्वोच्च न्यायालयाने गोगावले यांची नियुक्ती रद्द ठरवली. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, भरत गोगावले यांना जी नियुक्ती केली होती, ती योग्य नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्याचे कारण त्यांनी सांगितले की भरत गोगावले हे राजकीय पक्षाचे प्रतिनीधी आहेत, का? हे पाहुन निर्णय घ्यावा, असे न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे भरत गोगावले यांनी निवड पुन्हा आम्ही करु शकतो, असेही नार्वेकर यांनी स्पष्ट केले. (Political Short Videos)

त्यामुळे भरत गोगावले (Bharat Gogawle) मुख्य प्रतोद आहेत की सुनील प्रभू मुख्य प्रतोद आहेत, याचे उत्तर देताना नेमके राजकीय पक्षाचे पतीनिधीत्व कोण करत होते. भरत गोगावले यांना प्रतोद म्हणून नियुक्त केले ती व्यक्ती की सुनिल प्रभू यांना प्रतोद म्हणून नियुक्त केली ती व्यक्ती या पैकी कोणती व्यक्ती राजकीय पक्षाच्या वतीने प्रदोद नियुक्त करण्यासाठी योग्य होती हे बघावे लागले, असेही नार्वेकर यांनी सांगितले.

ही संपूर्ण प्रक्रिया ही राजकीय पक्ष कोणता आहे, त्यापासून ही प्रक्रिया सुरु होणार आहे. या पूर्णी निवडणूक आयोगानेही या संदर्भातील निर्णय घेतला आहे. मात्र, आपण पूर्वलक्षी निर्णय घ्यायचा आहे. तसेच १५ दिवसांमध्ये प्रक्रिया पूर्ण झाली तर १५ दिवसांमध्ये निर्णय घेऊ. पण जर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ लागला तर निर्णय घ्यायलाही वेळ लागले. मी निर्णय काय घेणार हे आता सांगणार नाही, असेही नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT