Mallikarjun Kharge Summoned : 'बजरंगबली'मुळे मल्लिकार्जुन खर्गे संकटात ; प्रचारातील विधान अंगलट आलं..

Mallikarjun Kharge Summoned News: बजरंग दलाची तुलना देश विरोधी कारवाया करणाऱ्या संघटनांसोबत केली आहे.
Mallikarjun Kharge
Mallikarjun KhargeSarkarnama
Published on
Updated on

Mallikarjun Kharge News: कर्नाटकात काँग्रेसचे सत्ता स्थापन होत असतानाच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. निवडणूक प्रचारात बजरंग दलाबाबत केलेलं विधान खर्गे यांच्या अंगलट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. (congress president mallikarjun kharge summoned on bajrang dal case notice of 100 crore in defamation case)

खर्गें यांच्यावर बजरंग दलानं मानहानीचा दावा केला आहे. संगरूर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश रमनदीप कौर यांनी खर्गेंवर शंभर कोटी रुपयांचा मानहानी दावा ठोकला आहे. याबाबतची त्यांना नोटीस पाठवली आहे.

हिंदू सुरक्षा परिषद बजरंग दल हिंदचे संस्थापक हितेश भारव्दाज यांनी याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कर्नाटक निवडणुकीत खर्गे यांनी बजरंग दलाची तुलना देश विरोधी कारवाया करणाऱ्या संघटनांना सोबत केली आहे, असल्याचा आरोप भारव्दाज यांनी केला आहे.

काँग्रेस सत्तेत आल्यास बजरंग दलावर बंदी घालणार, असे विधान खर्गे यांनी एका रॅलीत केले होते. यामुळे हितेश भारव्दाज यांनी संगरुर न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी १० जुलै रोजी संगरुर न्यायालयात हजर राहण्याचा आदेश खर्गे यांना न्यायालयानं दिला आहे.

Mallikarjun Kharge
Karnataka Chief Minister : कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाबाबत काँग्रेस अध्यक्ष खर्गेंचे मोठे विधान

कर्नाटकात काँग्रेसला मिळालेल्या दणदणीत विजयानंतर मुख्यमंत्रीपदाची माळ माजी मुख्यमंत्री सिद्धरमैय्या यांच्या गळ्यात पडते की प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार यांच्या गळ्यात पडते याची त्यांच्या समर्थकांसह सर्वच वाट पाहात आहे. सिद्धरमैय्या आज पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी दिल्लीला जाणार आहेत. डी.के.शिवकुमार यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे ते दिल्लीला जाण्याची शक्यता कमी आहे.

Mallikarjun Kharge
Pune NCP News: राष्ट्रवादीला मोठं खिंडार : 'मिशन बारामती' मध्ये बडा नेता भाजपमध्ये..; उद्या कमळ हाती घेणार

कोणाला मुख्यमंत्री करायचे हे काँग्रेसला ठरवायचे आहे? यासाठी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बंगळुरू येथील शांग्री-ला हॉटेलमध्ये काल बैठक झाली. डी.के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यासह सुशील कुमार शिंदे, दीपक बावरिया आणि भंवर जितेंद्र सिंह या तीन निरीक्षकांच्या उपस्थितीत ठरवण्यात आले की काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हेच विधिमंडळ पक्षनेत्याची निवड करतील.

सिद्धरामय्या यांनी हा प्रस्ताव मांडला होता, त्याला शिवकुमार यांच्यासह सर्व आमदारांनी पाठिंबा दिला.मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार असले तरी डी.के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्या समर्थकांमध्ये जुंपली आहे. दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी बॅनरबाजी सुरु केली आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com