Chandrakant Raghuwanshi Sarkarnama
मुंबई

Chandrakant Raghuwanshi: विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब

Maharashtra MLC Election 2025 Shivsena Chandrakant Raghuwanshi Candidature: नंदूरबारचे माजी नगराध्यक्ष आणि सध्या शिवसेनेच्या शिंदे गटात असलेले चंद्रकांत रघुवंशी यापूर्वी काँग्रेसमध्ये होते.

Mangesh Mahale

Vidhan Parishad Bye-Elections: विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. भाजपकडून तीन नावे जाहीर करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर करणार असल्याची माहिती आहे. नंदूरबारचे माजी नगराध्यक्ष आणि सध्या शिवसेनेच्या शिंदे गटात असलेले चंद्रकांत रघुवंशी यापूर्वी काँग्रेसमध्ये होते. विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी 27 मार्चला निवडणूक होत आहे.

विधान परिषदेसाठी नंदुरबारमधून चंद्रकांत रघुवंशी यांचे नाव गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत होते. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हे शिवसेना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख आहेत.

चंद्रकांत रघुवंशी यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईला बोलवून घेतले आहे. यापूर्वी दोनवेळा त्यांचे नाव चर्चेत होते. दोन्ही वेळेस त्यांना तिकीट मिळाले नाही. विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी विधान सभा लढवली होती. ते जिंकून आल्याने त्यांना विधान परिषदेचा राजीनामा दिला आहे.

या रिक्त जागेसाठी शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. चंद्रकांत रघुवंशी यांचा विधान परिषदेच्या आमदारकीला भाजपचे माजी खासदार डॉ.हिना गावित यांचा तीव्र विरोध केला आहे.

लोकसभा निवडणुकीत आपल्या विरोधात चंद्रकांत रघुवंशी यांनी प्रचार केल्याचा आरोप हिना गावित यांनी केला आहे. याबाबत त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे त्यांची तक्रार केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT