Maharashtra civic polls results are postponed to December 21. The delay has intensified political reactions across the state, especially regarding the civic election process. Sarkarnama
मुंबई

Local Body Elections Result : 'यंत्रणेचं अपयश, उमेदवारांचा भ्रमनिरास...'; मतमोजणीची तारीख पुढे जाताच CM फडणवीसांनी निवडणूक आयोगाला सुनावलं

CM Devendra Fadnavis On Local Body Elections Result : राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या २४ नगराध्यक्ष आणि १५४ जागांवरील निवडणूक स्थगित केल्यानंतर आता निकालाबाबतही मोठी बातमी समोर आली आहे. आयोगाच्या निर्णयाविरोधात मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती.

Jagdish Patil

Mumbai News, 02 Dec : आज राज्यभरात नगरपंचायत आणि नगरपरिषदेसाठी मतदान पार पडत आहे. आज होणाऱ्या मतदानाचा निकाल उद्या म्हणजे ३ डिसेंबरला जाहीर होणार होता. मात्र, आता तो निकाल २१ डिसेंबरला जाहीर होणार आहे.

मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या या निर्णायामुळे आता सर्व उमेदवारांसह जीव टांगणीला लागला आहे. तर मतमोजणीची तारीख पुढे ढकलण्याच्या मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

'मागील २५ ते ३० वर्षांपासून मी निवडणूका पाहतोय पण असं पहिल्यांदा घडतंय, घोषित केलेल्या निवडणुका आणि निकाल पुढे जातोय, ही पद्धत फार योग्य वाटत नाही', अशा शब्दात त्यांनी या निर्णायवर नाराजी दर्शवली आहे.

मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

माध्यमांनी कोर्टाच्या निर्णयावर प्रतिक्रिया विचारली असता मुख्यमंत्री म्हणाले, 'मागील २५ ते ३० वर्षांपासून मी निवडणूका पाहतोय पण असं पहिल्यांदा घडतंय. घोषित केलेल्या निवडणुका आणि निकाल पुढे जातोय, ही पद्धत फार योग्य वाटत नाही. पण अर्थात खंडपीठाचा निर्णय मान्य करावा लागेल. आयोग स्वायत्त आहे. परंतू जे उमेदवार प्रचार करतात त्यांचा भ्रमनिरास होतो.

सिस्टमच्या अपयशामुळे सर्वांना भ्रमनिरास होतो. या सगळ्या प्रक्रियेत आयोगाने सुधार आणला पाहिजे आणि किमान पुढील निवडणुकीत असं होणार नाही, असं आयोगाने बघितलं पाहिजे, असं म्हणत त्यांनी आयोगाला सुनावलं. शिवाय यावेळी त्यांनी आयोगाचा वकील कोण आहे माहिती नाही पण त्यांनी कोर्टाच्या निकालाचा चुकीचा अर्थ लावला, असंही म्हटलं आहे.

दरम्यान, ही सर्व प्रकिया सगळ्या गोष्टी फॉलो झालेल्या आहेत आणि कोणीतरी कोर्टात गेलं म्हणून निवडणुका पुढे ढकलणं हे कुठल्याचं तत्वात बसत नाही. हेs अतिशय चुकीचं घडलं आहे. या निर्णयावर माजी वैयक्तिक नाराजी व्यक्त केली असून ती कायद्यावर आधारीत आहे, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.

नेमकं प्रकरण काय?

राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या २४ नगराध्यक्ष आणि १५४ जागांवरील निवडणूक स्थगित केल्यानंतर आता निकालाबाबतही मोठी बातमी समोर आली आहे. आयोगाच्या निर्णयाविरोधात मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेमध्ये आज होत असलेल्या मतदानाचा निकालही पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. ही मागणी हायकोर्टाने मान्य केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT